अनवर्दे खुर्द गाव विकासाच्या मानकरी माजी सरपंच कै.सौ. सविता शिरसाठ : सासरी माहेरी केली अखंड सेवा.. ( जिल्हा विभागीय उपसंपादक)चोपडा येथील कैलासवासी सविता संजीव शिरसाठ यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या अल्प जीवनकाळात केलेले गाव विकासाचे, सासर माहेरच्या सेवेचे व विविध संस्था संघटनांचे सेवेत आदर्श नारी म्हणून आपला ठसा उमटविला. सौ. सविता शिरसाठ यांच्या जन्म 11 नोव्हेंबर 1974 रोजी स्वामी समर्थ यांच्या पादस्पर्शाने पुणीत झालेल्या दिंडोरी गावात सुकलाल कोळी यांच्या घरात झाला. सुखलाल कोळी यांचे मूळ गाव हिंगोणे बुद्रुक तालुका एरंडोल जिल्हा जळगाव हे होय. सुकालाल कोळी हे पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून नोकरीला होते. त्यांची सतत दर दोन-तीन वर्षांनी बदली होतअसे. असे असतानाही सौ. सविता शिरसाठ यांनी कला शाखेत पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. * सासरचे वैभव* त्यांचे लग्न 27 एप्रिल 1999 रोजी अनवर्दे खुर्द येथील आदिवासी सेवक, उत्तम राजकारणी, दूरदर्शी व्यक्तिमत्व, असलेले कैलासवासी पांडुरंग नारायण शिरसाठ यांचे थोरले चिरंजीव श्री. संजीव शिरसाठ यांच्याशी झाला. पती संजीव शिरसाठ हे सातपुडा आदिवासी वस्तीगृहाचे अधीक्षक होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष कोली / कोरी सामाजिक ऐकता संघटन न्यु दिल्ली ' अनवर्दे खुर्द गावाचे माजी सरपंच सौ. सविता संजीव शिरसाठ यांचे सासरे पांडुरंग शिरसाठ हे त्रिकालदर्शी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या राजकारण , समाजकारणाचा व पत्रकारितेचा गाढा अनुभव होता. त्यां जोरावर त्यांनी फेब्रुवारी 2008 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सासू दुर्गाबाई पांडुरंग शिरसाठ व सून सविता संजीव शिरसाठ यां दोघां सासू सुनांना बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आणले. हे कदाचित महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असेल. *सरपंच पदाचा मान सासू ऐवजी सुनेला दिला* कै.सौ. सुनीता संजीव शिरसाठ या अनवर्दे खुर्द गावाच्या सरपंच झाल्यात. * गावाच्या चौफेर विकास* कै.सौ. सविता शिरसाठ यांनी सरपंच पदाची सूत्रे घेताच त्यांनी झपाट्याने गाव विकासाच्या कामांकडे लक्ष दिले. गावात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवले. गाव स्वच्छ केले. गावातील शेतकऱ्यांचा सर्वात मोठा यक्ष प्रश्न म्हणजे शिव रस्ते. तो त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सोडविला. त्यात त्यांना फार मोठे यश आले. त्याकाळी हे एक आदर्श मॉडेल तयार झाले. म्हणून त्यांची कामगिरी अव्वल ठरली प्रांताधिकारी, तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करीत जिल्ह्यात इतर गावांनी आदर्श घ्यावा. अशी कामगिरी केल्याने त्यांचे अभिनंदन केले. आई इंदुबाई वारल्यानंतर कै. सौ. सविता शिरसाठ यांनी वडिलांना आपल्या घरी बोलवत जिवंत असेपर्यंत सेवा केली. * संसार वेलीवर दोन फुले* त्यांचा सुखी संसार सुरू असताना चि. पवन व चि.अनिष्का असे दोन फुले उमललेत. पवन याने बिटेक रोबोटिक व कॉम्पुटर सायन्स यात पदवी घेतली आहे. त्याच वेळी त्याने बॅल्नसिंग ॲक्ट' या पुस्तकाचे लेखन केले. त्याचे प्रकाशन 'नेशन प्रेस' व 'अमेझॉन'या अग्रगण्य संस्थानी प्रकाशन केले. याचा सार्थ अभिमान सौ. सविता शिरसाठ यांना होता. मुलगी चि.अनिष्का सिव्हिल इंजिनिअर होऊन जॉबला लागली. सर्व सुख वैभव पायाशी लोळण घेत असतांना देवाने या लेकरांपासून त्यांना हिरावून घेतले. *कै सविता शिरसाठ यांनी भुषविलेले पदे* कोली / कोरी समाज प्रदेश अध्यक्ष ' अध्यक्षा विरांगणा झलकारी बाई आदिवासी मागासवर्गीय बहु . महिला मंडळ अनवर्दे खु ॥ 'सचिव बिरसांमुंडा आदिवासी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था चोपडा ' सचिवआदिवासी बहु उद्देशिय संस्था कुंड्यापाणी असे अनेक पदे भुषविले आहेत . *अपघात आणि मृत्यु* कै. सौ. सविता शिरसाठ यांचा नाशिक शहरात दिनांक ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुचाकीवर जात असताना अपघात झाला. त्यांना नाशिक शहरातील नामांकित रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले. मृत्यूशी झुंज देत असताना मात्र दुर्दैवाने त्यांचे दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे .दिनांक २४ / ०९ / २०२५ वार बुधवार रोजी त्यांचे वर्षे श्रद्धा निमित्ताने विनम्र अहिवादन ॥ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण ॥

अनवर्दे खुर्द गाव विकासाच्या मानकरी माजी सरपंच कै.सौ. सविता शिरसाठ : सासरी माहेरी केली अखंड सेवा..                                                                                         
Previous Post Next Post