*श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयात 'ऑपरेशन पोलो' 'ऑपरेशन सिंदूर' माहितीपट उपक्रम*. (रावेर जाकीर तडवी)(ता. २३ सप्टेंबर): श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयात "सेवा पखवाडा" या उपक्रमाअंतर्गत दिनांक २३ सप्टेंबर रोजी देशाच्या एकात्मतेसाठी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या कार्यावर आधारित माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सरदार पटेल यांच्या कणखर नेतृत्वाची आणि "ऑपरेशन पोलो" या ऐतिहासिक लष्करी मोहिमेच्या पार्श्वभूमीची सखोल माहिती देणे हा होता.यावेळी विद्यार्थ्यांना "ऑपरेशन सिंदूर" या विषयावर माहितीपट दाखवण्यात आला. यामार्फत देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने घेतलेल्या धाडसी निर्णयांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. यावेळी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.बी. जी. मुख्यदल, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. बी. धनले यांची उपस्थिती लाभली.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानावर प्रकाश टाकला. "ऑपरेशन पोलो" या लष्करी मोहिमेमुळे भारताची अखंडता टिकवण्यासाठी घेतलेले धाडसी निर्णय हे देशप्रेमाचे सर्वोच्च उदाहरण असल्याचे सांगितले.तसेच, "ऑपरेशन सिंदूर" सारख्या आधुनिक काळातील लष्करी कार्यवाह्यांमधून भारतीय लष्कराची सजगता आणि राष्ट्रनिष्ठा स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानावर भर न देता, देशभक्ती, एकात्मता आणि जबाबदार नागरिकत्व या मूल्यांची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर महाजन, सहाय्यक अधिकारी प्रा. एल.एम.वळवी, महिला अधिकारी प्रा. एस. बी. राजकुंडल आणि प्रा. तेजस दसनूरकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कार्यक्रमात मोलाचे सहकार्य लाभले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0