*नवरात्रोत्सव* काळात महोउत्सव साजरा करताना *कायद्याचे* पालन करा*..पो.नि. संदीप बोरकर पाटील. (*मानवत विभागीय संपादक अनिल चव्हाण }———————— नवरात्रोत्सव काळात उत्सव साजरा करताना नागरिकांनी कायद्याचे पालन करून नवरात्रो महोत्सव साजरा करावा असे आवाहन मानवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बोरकर पाटील यांनी नागरिकांना केले आहे. नवरात्रोत्सव कार्यकाळात शिस्तबद्ध , व शांततापूर्ण वातावरण राखणे हे प्रत्येक नागरिका बरोबर आयोजक मंडळाचे कर्तव्य आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवा प्रमाणेच नवरात्रोत्सवात देखील सार्वजनिक मंडळ यांच्यासह इतर आयोजकांनी *लेझर व डीजेचा* वापर करू नये, अशी स्पष्ट सूचना पोलिस प्रशासनाच्या वतीने यूवकासह आयोजक मंडळांना करण्यात येत आहे. नियमाचे काटेकोर पण पालन करावे , नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल गणेशोत्सव काळातील मुख्य विसर्जन मिरवणुकी दरम्यान नियमांचे पालन करून कार्यक्रम निर्विघ्न पणे पार पडला. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव काळात ही आयोजकांनी स्वयं शिस्त पाळावी. रेणुकादेवी यात्रोत्सव तसेच शहरातील विविध ठिकाणी होणाऱ्या गरबा , दांडिया कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. या वर्षी गणेशोत्सवात ध्वनी मर्यादा भंग झाल्याची नोंद झालेली नाही. त्यानुसारच नवरात्रोत्सवात ही मंडळांनी जबाबदारीने उत्सव साजरा करावा.अशी अपेक्षा आहे. येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी मंडळांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच सुरक्षा उपाययोजना गरबा दांडिया मध्ये महिला व तरुणींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मा. पोलिस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक, पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली काका, दीदी, पथक व दामिनी, पथक यांच्यासह स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा व होमगार्डचा (गृहरक्षक दल ) अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येईल. महिला व तरुणींना तातडीने मदत अपेक्षित असल्यास त्यांनी 'डायल 112' वर संपर्क साधावा. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस व्हॉट्सअप हेल्पलाइन किंवा नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा. धडक तपासणी मोहीम काही सामाजिक मंडळे व संस्था दांडिया गरब्याचे आयोजन मंगल कार्यालयांमध्ये रात्री उशिरापर्यंत करतात. या पूर्वी अशा ठिकाणी डीजे व लेझरचा वापर झालेला आढळून आला आहे. त्यामुळे यंदा परवानगी अटी शर्ती सह दिली जाणार असून पोलिसांची विशेष पथके धड़क तपासणी मोहीम राबवतील ध्वनिमर्यादा व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे *पोलीस निरीक्षक संदीप बोरकर पाटील* यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना मत व्यक्त केले.**
byमीडीया पोलीस टाईम
-
0