मनमाडमध्ये दुर्दैवी घटना – वासराचा मृत्यू, माता गाईचा आक्रोश.. (मनमाड दि. 19/09/2025 :आज सकाळी मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातील *पकीजा कॉर्नर* येथे एक हृदयद्रावक घटना घडली. एका गाईने रस्त्यावर वासराला जन्म दिला, परंतु नवजात वासरू दुर्दैवाने वाहनाखाली येऊन जागीच मृत्यूमुखी पडले.या प्रसंगाने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. गाय आपल्या मृत वासराचे रक्षण करण्यासाठी आक्रमक झाली होती व तिने कोणालाही जवळ येऊ दिले नाही. त्यामुळे वाहतूक खोळंबली. घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी धाडस करून त्या गाईला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.यावेळी *Aghorianimalrescue व अनुसया कमल फाउंडेशन* शुभम दोंदे व मनमाड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी वैभव भामरे व प्राणी कल्याण अधिकारी सतिशजी परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि आग्रा रोडवरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.अनुसया कमल फाउंडेशनमार्फत मनमाड नगरपालिकेकडे वारंवार गोशाळा स्थापनेची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्याप यावर कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. जर शहरात सुरक्षित गोशाळा उभी राहिली असती, तर आजची ही दुर्दैवी घटना घडली नसती.नागरिकांचा ठाम आग्रह आहे की, मनमाडमध्ये कायमस्वरूपी गोशाळा उभारण्यात यावी, जेणेकरून सर्व भटकी जनावरे सुरक्षितपणे एका ठिकाणी ठेवता येतील, अपघात टाळता येतील व शहरात प्राणी-मानव सहजीवनाची शाश्वत सोय होईल.

मनमाडमध्ये दुर्दैवी घटना – वासराचा मृत्यू, माता गाईचा आक्रोश..                                                                                
Previous Post Next Post