मनमाड शहरातील भटकी गाईमध्ये लंपीसारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षण दिसल्याने तात्काळ कार्यवाही... मनमाड दि. \_\_ : महाराष्ट्र शासन प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीचे मानद प्राणी कल्याण अधिकारी श्री. सतीश रत्नसिंह परदेशी यांनी पंचायत समिती नांदगावचे पशुसंवर्धन विस्तार अधिकारी मा. डॉ. एन. टी. ताठे यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होतीया अनुषंगाने विस्तार अधिकाऱ्यांनी त्वरित नोंद घेऊन संबंधित प्रकरण स्थानिक पशुधन विकास अधिकारी सौ. डॉ. दीपाली खवसे यांच्याकडे पाठवले. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत, आजारी जनावरांना योग्य उपचार देणे व प्राणी क्रूरता होऊ नये यासाठी कडक सूचना दिल्या आहेत.विशेषतः –* ज्या गाईमध्ये लंपीसारख्या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळली आहेत, त्या गायींना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याचे व त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.* शहरातील इतर भटक्या गाईंमध्ये हा आजार पसरणार नाही याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.* पुढे अशाप्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी नगरपरिषद व पंचायत समिती यांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असेही सांगण्यात आले आहे.या आदेशामुळे आजारी जनावरांना वेगळे करून त्यांच्यावर योग्य उपचार केले जाणार असून, शहरात लंपीसारख्या आजाराचा प्रसार थांबविण्यास मोठी मदत होणार आहे.

मनमाड शहरातील भटकी गाईमध्ये लंपीसारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षण दिसल्याने तात्काळ कार्यवाही...                                                                                        
Previous Post Next Post