जि प प्रा शाळा कुसुंबे येथील श्री विजय गोसावी सर यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार.. (जळगाव हमीद तडवी)रावेर तालुक्यातील जि. प. प्रा.शाळा कुसुंबे शाळेतील अभ्यासू व कार्य तत्पर शिक्षक श्री विजय गोसावी सर यांना 2024/25 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून त्यानिमित्ताने जि प शाळा कुसुंबे बु. येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री तुकाराम प्रजापती सर व श्री गिरीश फेगडे सर तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी दीपक कोंडे सर, अरबी तडवी सर, मारुती मंजुळे सर, साफिया तडवी मॅडम, उमेश झोपे सर, सारिका महाजन मॅडम हे शिक्षकही उपस्थित होते. खरच ते खूप मेहनती, अभ्यासू व नवनवीन ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात, शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक नवनवीन गोष्टींचे ते माहीती मिळवत असतात, अनेक प्रशिक्षणात सुलभक म्हणून काम देखील ते करत असतात.यावेळी सर्व शिक्षक.शिक्षिका आणि मीडीया पोलीस टाईम चे मुख्य संपादक हमीद तडवी यांनी सर्वांनी श्री विजय गोसावी सर यांचे सत्कार करुन अभिनंदनाच्या शुभेच्छा दिल्या..
byमीडीया पोलीस टाईम
-
0