मा. श्री.मुख्यमंत्री महोदय,श्री. देवेंद्र फडणवीस साहेब,मंत्रालय, मुंबई - ४०००३२.विषय: अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष एडवोकेट धर्मपाल मेश्राम साहेबांच्या कार्यकाळात कमीतकमी सहा महिन्यांची मुदतवाढ करण्याबाबतची नम्र विनंती.महोदय, वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास नम्र विनंती करीत आहे की,आदिवासी पारधी समाजाच्या विविध संघटना, संस्था, अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांच्या वतीने आपणास नम्र नमस्कार. आम्ही पारधी समाजातील वंचित, शोषित व दुर्लक्षित घटकांसाठी सदैव न्यायाच्या लढ्यात एकजुटीने पावले उचलत आहोत. आज आपणास लिहित असताना, आमच्या समाजाच्या प्रलंबित व गंभीर प्रकरणांना न्याय मिळवण्यासाठी एक महत्वाची विनंती करीत आहोत.महाराष्ट्रातील पारधी समाज हा अति मागास व आदिवासी समाज असून, त्याच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रकरणांवर अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपालजी मेश्राम साहेब यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पारधी न्याय संकल्प परिषदेच्या प्रथम कार्यक्रमात, १४ एप्रिल २०२५ रोजी आदिवासी पारधी समाजाच्या विविध मागण्या व गंभीर १०८ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार २५ आणि २६ जून २०२५ रोजी विशेष सुनावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यात ३० हून अधिक गंभीर प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. मात्र, महाराष्ट्र शासनाने जमाती आयोगांचा कार्यभार त्यांच्याकडून काढून घेतल्याने ही प्रक्रिया अडकली असून, अजूनही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.या पार्श्वभूमीवर, ऍड. धर्मपाल मेश्राम साहेबांच्या कार्यकाळात कमीतकमी सहा महिन्यांची मुदतवाढ किंवा पूर्ण वेळ अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष पद बहाल करण्याची मागणी आम्ही उपस्थित करीत आहोत. शासनाने त्यांच्या रूपाने दिलेल्या या संधीचा लाभ घेऊन पारधी समाजाच्या सर्व प्रलंबित प्रकरणांना निकाली काढण्यासाठी ही मुदतवाढ अपरिहार्य आहे. आम्ही शासनाच्या निर्णयांचा आदर करतो, पण आमच्या समाजाच्या न्यायासाठी ही वाढ आवश्यक आहे. गाव-कोस दूर राहणाऱ्या या समाजाला खरा दिलासा देण्यासाठी आपल्या सक्षम नेतृत्वाची अपेक्षा आहे.महोदय, आम्ही सर्व पारधी समाजाच्या संघटनांना एकत्र येऊन आपल्या कार्यालयाकडे ही विनंती करण्याचे आवाहन करीत आहोत. आपणास विनंती करतो की, या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन पारधी समाजाला न्यायाची खरी हमी द्यावी. हे केल्यास आमचा समाज सदैव आपल्या ऋणी राहील.धन्यवाद.आदरणीय,आदिवासी पारधी समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी ..दिनांक: १९ सप्टेंबर २०२५

byमीडीया पोलीस टाईम
-
0