ग्रामीण भागात सत्यशोधक विचार,रुजवणारे सत्यशोधक पत्रकार. (आनंद कुरूडवाडे जिल्हा ग्रामीण/ प्रतिनिधी नांदेड ) नांदेड : 24 सप्टेंबर 1873 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. दिन दुबळे लोकांसाठी व लोकांचे सामाजिक न्याय, शिक्षण व अंधश्रद्धे विरुद्ध भटबामनांच्या कार्य विधी, त्यांच्या हाताने बहुजन समाजाने न करून घेता स्वतःच्या हाताने, दुःखाचं कार्य असो किंवा सुखाचे कार्य असो बहुजन समाज स्वतः, विधी व कार्य करू शकतो. मातंग समाजामध्ये सत्यशोधक विचार रुजवणे, व सत्यशोधक धर्माचे प्रचार करण्याचे कार्य,पत्रकार मारोती एडकेवार यांनी 2017 पासून, स्वतःचं लग्न सुधा स्वतःच लावून घेऊन सत्यशोधक समाजाचे कार्य हातात घेतले,व सतत चालू आहे त्यांनी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात ग्रामीण,भागांमध्ये मातंग समाजात,सत्यशोधक विचार प्रत्येक माणसांमध्ये रुजवण्याचं काम करत असतात.पत्रकार मारोती एडकेवार यांनी सत्यशोधक पद्धतीचे विवाह लावून आनेक, कुटुंबाला सत्यशोधक बनवण्याचं काम करत असतात,पत्रकारितेच्या माध्यमातून.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, प्रत्येक जनतेमध्ये बहुजन समाजाला सत्यशोधक व्हावं,आणि सत्यशोधक पद्धतीने आचरण करावे. त्यामुळे आपले कोणतेही कार्य कमी खर्चामध्ये होत असते त्यामुळे,बहुजन समाजाने सत्यशोधक पद्धतीचे विवाह करावे.असे त्यांनी अनेक वेळा मनोगतातून,व्यक्त केले आहे.सत्यशोधक समाज हा समानता, स्वातंत्र्य,आणि बंधुत्व व शिक्षणावर भर देणारा असून,अनिष्ट रूढी परंपरा यांना न म्हणता सामान्य सर्व समाजाला समान हक्क व स्वातंत्र्य, शिक्षण,देण्याचे कार्य सत्यशोधक समाज सांगते पत्रकार मारोती एडकेवार यांनी ग्रामीण,भागात सत्यशोधक समाज रुजवल्याबद्दल त्यांचे आज सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व पत्रकारांकडून त्यांना पुढील कार्य असं चालू राहण्याच्या शुभेच्छा व अभिनंदन करत आहेत व कौतुक होत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0