*पत्रकार गिरमाजी सुर्यकार यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या "नांदेड डिजिटल अँण्ड प्रिंट मीडिया" सेलवर निवड*------------------------*. (धर्माबाद प्रतिनिधी : गजानन वाघमारे )चित्रपट, दूरचित्रवाणी, इंटरनेट आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि कामगारांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या नांदेड विभागांतर्गत गिरमाजी सुर्यकार यांची युनियनच्या डिजिटल अँण्ड प्रिंट मीडिया सेलचे सदस्य म्हणून युनियनचे महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष आमले यांच्या शिफारशीने व राष्ट्रीय अध्यक्ष अजित म्हमूनकर यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे.युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित म्हमूनकर यांच्या स्वाक्षरीने दिनांक 28 सप्टेंबरला हे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे. या पत्राद्वारे गिरमाजी सुर्यकार यांना युनियनचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले असून, त्यांना संघटनेचे ध्येय धोरणे आणि कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दादासाहेब फाळके चित्रपट युनियन ही भारत सरकारच्या ट्रेड युनियन अॅक्ट, 1926 अंतर्गत नोंदणीकृत असून, ती चित्रपट उद्योगातील निर्माते, मालक आणि कला तंत्रज्ञानांना योग्य सेवा देण्यासाठी आणि त्यांचे समस्यांचे निराकरण करून न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात कार्यरत आहे. गिरमाजी सुर्यकार यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल त्यांच्यावर जिल्हा व तालुका स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

पत्रकार गिरमाजी सुर्यकार यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या "नांदेड डिजिटल अँण्ड प्रिंट मीडिया" सेलवर निवड*------------------------*.                                         
Previous Post Next Post