दत्तापूर-धामणगाव रेल्वे परिसरातील मंगलमुखी किन्नर नवदुर्गा उत्सव मंडळाचा पहिला भव्य उत्सव आणि सत्कार सोहळा.. ( प्रतिनिधी वर्धा ग्रामीण.विपुल पाटील ) दत्तापूर-धामणगाव रेल्वे परिसरात मंगलमुखी किन्नर नवदुर्गा उत्सव मंडळाने पहिल्यांदाच भव्य नवदुर्गा उत्सव साजरा केला. या कार्यक्रमास गावातील अनेक नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. भाजप अमरावती जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई पाटील, आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर किशोर विजय बन्नोटे, वर्धा जिल्हा अध्यक्ष विपुल पाटील, समाजसेवक अमोल भांगे, दत्तापूर हेड कॉन्स्टेबल मनोज धोटे व पत्नी सुनिता धोटे, तसेच ज्येष्ठ पत्रकार संतोष वाघमारे,सलमान भाई. अमोल येसनकर, भूषण वाघमारे, विनोद तिरले, सुरेश सव्वालाके, आदिनाथ हजारे, प्रेम काळबांडे यांसह लहुजी शक्ती सेना आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. भजनी मंडळाचे अध्यक्ष निस्तानी ताई व त्यांच्या मंचाला बरखाताई ताईंनी ओटी भरून खास सन्मान केला. गुरुमाऊली बरखाताई, किन्नर समाजातील बरखाताई, आशुताई, तेजू ताई, जोशनाताई, श्रद्धा ताई यांनी कार्यक्रमात सांस्कृतिक रंगत वाढवली. डॉक्टर किशोर बमणोटे आयुष भारत असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष यांनी ज्योतीताई पाटील भाजपा अमरावती जिल्हा सरचिटणीस यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले. त्याचप्रमाणे संतोष भाऊ वाघमारे जेष्ठ पत्रकार धामणगाव रेल्वे. समाजसेवक अमोल भाऊ भांगे, पत्रकार अमोल येसनकर आणि किन्नर समाजाचेही आदरपूर्वक स्वागत करण्यात आले. सव्वा लाखे सरांनी हेड कॉन्स्टेबल मनोजजी धोटे व त्यांच्या पत्नी सुनीता धोटे यांना शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर आयुष भारत डॉक्टर असोसिएशन वर्धा जिल्हा अध्यक्ष. आणि पत्रकार विपुल पाटील यांनी लहुजी शक्ती सेना प्रमुख विनोद तिरले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाची सांगता सुरेखपणे झाली आणि उपस्थितांनी एकात्मतेचा संदेश देत उत्सव यशस्वी केला. अशा सामाजिक बंध दृढ करणाऱ्या कार्यक्रमांनी किन्नर समाजाला मानाचा व सन्मानाचा लाभ होतो आणि सामाजिक समरसतेला चालना मिळते.[29/09, 16:00] MPT वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी विपुल पाटील: दत्तापूर-धामणगाव रेल्वे परिसरातील मंगलमुखी किन्नर नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पहिल्या नवदुर्गा उत्सवाला प्रमुख उपस्थिती: 1. ज्योतीताई पाटील - भाजप अमरावती जिल्हा सरचिटणीस 2. डॉक्टर किशोर विजय बमणोटे - आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष 3. डॉक्टर विपुल पाटील - आयुष भारत वर्धा जिल्हा अध्यक्ष 4. अमोल भांगे - समाजसेवक 5. मनोज धोटे - दत्तापूर हेड कॉन्स्टेबल, पत्नी सुनिता धोटे 6. संतोष वाघमारे - ज्येष्ठ पत्रकार 7. अमोल येसनकर - पत्रकार 8. भूषण वाघमारे, हजारे सर, ठाकरे सर, ठाकूर सर . सवालाखे सर.9. विनोद तिरले - लहुजी शक्ती सेना 10. निस्तानी ताई - भजनी मंडळ अध्यक्ष 11. बरखाताई, आशुताई, तेजू ताई, जोशनाताई, श्रद्धा ताई - किन्नर समाजातील मान्यवर सगळ्यांनी एकत्र येऊन स्वागत, सन्मान आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. 😊
byMEDIA POLICE TIME
-
0