**वातावरणातील बदला मुळे जन जिवन विस्कळीत.**व्यापार पेठेसह प्रवाशांनी रापमकडे पाठ फिरविली*. ( मानवत / प्रतिनिधी. {अनिल चव्हाण }————————————मराठवाड्यात वातावरणातील बदलामुळे सतत पडत असलेल्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले असून त्यामुळे व्यापार पेठेसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना सुध्दा झळ पोहचली असल्यामुळे बसेस कमी भार प्रवाशी घेऊन ये जा करतांनी दिसत आहे. तर शहरातील व्यापार पेठेवर याचा परिणाम जाणवत असल्यामुळे व्यापार पेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.मानवत तालूक्यासह परभणी जिल्हात सतत पडत असलेल्या पावसामुळे नदी नाले होसंडून वाहत आहे तर अनेक पूलावरून पाणी वाहत असल्याने वाहनांची रहदारी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून थांबविण्यात आली. त्यामुळे व्यापार पेठेवर संक्रात ओढविली आहे. तालूक्यातील शेतीचे मोठे नूकसान झाले असून खासदार , आमदार मंत्री यांनी नूकसानीचे दौरे काढून फोटो सेशन केले आहे. पण शेतकर्‍यांच्या पदरात फक्त आश्वासनाचे दान मिळाले पण सरकारने धडाक्यात अजून निर्णय घेतला नाही, त्यामुळे शेतकर्‍यामधून नाराजीचा सूर उमटत आहे.वातावरणातील बदलामुळे मानवत तालूक्यावर अस्माणी संकटा बरोबर सूलतांनी संकट घोंगावत आहे.त्यामुळे तालूक्यासह जिल्हातील नागरिकांचे जन जिवन विस्कळीत झाले आहे.*

वातावरणातील बदला मुळे जन जिवन विस्कळीत.**व्यापार पेठेसह प्रवाशांनी रापमकडे पाठ फिरविली*.                                                                         
Previous Post Next Post