यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मधील विद्यार्थ्याने नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. . ( यावल दि.१९ ( सुरेश पाटील )येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्याने शालेय नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत पटकविले रौप्य पदक पटकाविले.१८ सप्टेंबर रोजी शालेय नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धा २०२५- २६ बॉक्सिंग स्पर्धा कै.दादासाहेब विश्वासराव जी रंधे क्रीडा संकुल,शिरपूर येथे आयोजित करण्यात आली होती.यात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मधील इ ७ वी चा विद्यार्थी भुषण रविंद्र भालेराव या विद्यार्थ्याची निवड झाली होती. यात भूषण भालेराव या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकाविले आहे. त्यानिमित्त भुषण भालेराव या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . यात विद्यार्थ्याचे कठोर परिश्रम, चिकाटी व क्रीडा शिक्षक सय्यद इरतेकाज सर यांचे मार्गदर्शन होते.या विजेत्या विद्याथ्याचे शाळेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप माहेश्वरी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांनी विद्यार्थ्याचे स्वागत व कौतुक केले व क्रीडा शिक्षक सय्यद इरतेकाज सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मधील  विद्यार्थ्याने नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले.  .                                                                              
Previous Post Next Post