अडावद ग्रामपंचायत कडून माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ .... ( फैजपूर प्रतिनिधी )अडावद ता.चोपडा वरील विषयान्वे दिनांक ०५/०६/२०२५ रोजी ऑनलाईन माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ३ अन्वये अर्ज केला होता. आपण मला दि. २८/०७/२०२५ रोजी जवळपास ५३ दिवसानंतर मला पत्र पाठवले जे आपल्याला माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार ३० दिवसाचा आत पाठवायचे होते. त्या पत्रात आपन लिहून पाठवले आहे कि. संर्दभः- १) मा. जनमाहिती अधिकारी तथा प्रशासन अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद जळगाव यांचे पत्र२) शासन परिपत्रक व संकीर्ण २०१७ /प्र.क्र. (२०८/१०) सहा दि.१७/११/२०१७३) शासन परिपत्रक क्र. केमाऊ २००९/प्र.क्र.३९८/०९ सहा दि.३१/०५/२०१२उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये मांगीतलेली माहिती ग्रामपंचायत आपणास उपलब्ध करून देण्यास तयार आहे. तरी सदर कामी लागणारी फी २३५/- भरल्या नंतर ग्रामपंचायत कडे फी भरलेले चलन सदर केल्या नंतर आपणास सदर माहिती तात्काळ उपलब्ध करून देईल. तसेच मी आपण वेळेत माहिती न दिल्यास प्रथम अपील केले होते. अपील सुनावणी दिनांक १३/०८/२०२५ रोजी प्रथम अपील अधिकारी तथा, म. गट विकास अधिकारी पंचायत समिती चोपडा. यांचा कडे घेण्यात आली आपण त्या ठिकाणी त्यांच्या समोर मी मांगीतलेली माहिती १) सन २०२३ ते २०२४, सन २०२४ ते २०२५, १५ व्या वित्त अयोग निधी व इतर शासकीय योजना निधी, ग्रामपंचायत अडावद ता. चोपडा साठी सर्व योजनेचे कामासाठी ऐकूण किती निधी शासनाकडून प्राप्त झाले आहे. तसेच सर्व निधी मंजूर संबंधाने वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रकाची (आदेश) झेरोक्स प्रत साक्षांकित करून मिळणेस विनंती आहे. २) सन २०२३ ते २०२४, सन २०२४ ते २०२५ ग्रामपंचायत अडावद ता. चोपडा यांचाकडून या वर्षाकरिता केलेल्या लेखा परीक्षण अहवाल चे सर्व कागदपत्राचे झेरोक्स प्रत साक्षांकित करून मिळणेस विनंती आहे. हि पूर्ण माहिती देण्यास तयार आहे असे कथन केले आहे. अपील निकालात देखील त्याच्या उल्लेख आहे. दोन वेळेस आपण माहिती देणास तयार आहे माहिती उपलब्ध आहे. असे कथन केले आहे परंतु सुनावणी नंतर आपण मला दि. १८/०८/२०२५ रोजी पत्र पाठवले कि माहिती ग्रामपंचायती कडे तूर्त उपलब्ध नाही. १) जर माहिती आपल्याकडे उपलब्ध न होती तर मला चलन भरून ग्रा.प आपल्याला तात्काळ माहिती उपलब्ध करून देईल असे का सांगितले. २) म प्रथम अपील अधिकारी यांच्या समोर सुनावणी वेळे पूर्ण माहिती देण्यास तयार आहे असे का सांगितले. या वरून आपण प्रथम अपील अधिकारी यांच्या अवमान करीत आहात असे दिसून येते. जी माहिती आपल्याकडे अगोदर उपलब्ध होती ती नंतर कुठे गेले. आपल्याकडून माहिती गहाळ करण्याच्या तसेच माहिती नष्ट करण्यात येत आहे का. जर तसे नसेल तर आपण सांगितल्या प्रमाणे मला माहिती तात्काळ ३ दिवसात उपलब्ध करून द्यावी.. अशी मागणी अडावद येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर नारायण चौधरी यांनी केली आहे

अडावद ग्रामपंचायत कडून  माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ ....                                                        
Previous Post Next Post