*जळगाव जिल्हा पँथर सेनेत नवा जिल्हा अध्यक्ष – लखन भाऊ पानपाटील* (जळगाव जिल्हा प्रतीनिधी : ऑल इंडिया पँथर सेनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष (पूर्वपदी) म्हणून लखन भाऊ पानपाटील यांची आज नियुक्ती करण्यात आली. कमी वय असूनही त्यांनी जळगाव, मुक्ताईनगर आणि जामनेर या भागात संघटनेचं भक्कम जाळं निर्माण केलं आहे.या नियुक्तीमुळे स्थानिक पँथर सेनेत नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला आहे. दिपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून, लखन भाऊ यांचे नेतृत्व भागातील चळवळीसाठी नवीन दिशा ठरवणार असल्याचे स्थानिक नेते सांगतात.स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले की, लखन भाऊ यांच्याकडून भागातील चळवळीला मोठं स्थान मिळेल आणि त्या चळवळीचं केंद्रस्थान निश्चितच उंचावेल. तसेच, आंबेडकरी चळवळीला अधिक बळकट करण्याची आशा त्यांनी पूर्ण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.यावेळी पँथर सेनेचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, लखन भाऊ यांची निवड कमी वयातही मोठा संघर्ष करणाऱ्या नेत्याची ओळख सिद्ध करते. आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील पँथर सेनेच्या चळवळीला नवीन गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लखन भाऊ पानपाटील यांना आगामी कार्यासाठी सर्व शुभेच्छा!
byमीडीया पोलीस टाईम
-
0