विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत विशेष तरतूदीसाठी प्रा.मकरंद पाटील यांची केंद्राकडे मागणी... (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार विशेष जिल्हा प्रतिनिधी ) शहादा : राष्ट्रीय कृषी परिषद-रबी अभियानांतर्गत कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 'विकसित कृषी संकल्प अभियानाचा' पुनःप्रारंभ ३ ऑक्टोबरपासून होणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा. मकरंद पाटील यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. प्रा.मकरंद पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री व पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या सविस्तर निवेदनात नमूद केले आहे की, नंदुरबार हा मुख्यतः आदिवासी बहुल आणि कृषीप्रधान जिल्हा असून येथील शेतकरी अद्यापही आधुनिक कृषी तंत्रज्ञान व शाश्वत संसाधनांपासून वंचित आहेत. हवामानातील अनिश्चितता, कमी उत्पादकता आणि आधारभूत सुविधांचा अभाव यामुळे येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अस्थिर आहे.'विकसित कृषी संकल्प अभियान' हे 'लॅब टू लँड' या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे माध्यम असून शेतकरी व कृषी संशोधन संस्थांमधील दरी भरून काढण्यावर भर देणारे आहे. या अभियानांतर्गत नंदुरबारसाठी अधिक संसाधने, कृषी तज्ज्ञ, प्रशिक्षण कार्यशाळा, तांत्रिक मार्गदर्शन, आणि जिल्हानिहाय लक्षित उपक्रम सुरु केल्यास येथील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल असेही प्रा. पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की, या विशेष प्रयत्नामुळे ना केवळ नंदुरबार जिल्ह्याचा समावेशक विकास साधता येईल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘समृद्ध भारत’ दृष्टिकोनालाही बळ मिळेल.शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना चालना देत नंदुरबारसारख्या आदिवासी भागाला कृषी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे शेवटी नमूद केले आहे.

विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत विशेष तरतूदीसाठी प्रा.मकरंद पाटील यांची केंद्राकडे मागणी..
Previous Post Next Post