*प्रशासकीय इमारतीकडे जाणार्‍या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष**. ( मानवत /वार्ताहर )**मानवत हे तालूक्याचे ठिकान असल्याने शासनाने प्रशासन चालविण्यासाठी प्रशासकीय ईमारतीची निमित्ती केली आहे. या ईमारती मध्ये महसूलचे तहसिल कार्यालय व ग्राम विकासाचे पंचायत समितीचे कार्यालय कार्यरत आहे. जवळच न्यायालय, व रजिस्टार दूय्यम निबंधक व शासकीय होस्टेल मूला - मुलींचे या कार्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एका रस्त्याची निर्मिती केली असून हजारो नागरिक व शेकडो लहान मोठी वाहणे या मार्गावरून कामकाज करण्यासाठी शासकीय ईमारती मध्ये येतात पण अनेक वाहन धारकांना रस्त्यावर पडलेल्या खड्याचा अंदाज न आल्याने अनेक वेळा अपघाता सारखे प्रसंग नित्याचे झाले आहे.प्रशासकिय इमारतीमध्ये दररोज तालूका दंडाधिकारी, तहसिलदार, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी , दूय्यम निबंधक , न्यायालय असल्याने शेकडो नागरिक व वकील बांधव याच रस्त्याने ये जा करतात प्रशासकीय इमारतीच्या गेट जवळच बांधकाम विभागाचे कार्यालय असून या कार्यालयातील अधिकार्‍यांना रस्त्यावरील जिव घेणारा खड्ा का ? दिसत नाही , हा सूज्ञ नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. मोठा अपघात झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डा बूजविणार का ? असा संताप जनक प्रश्न सध्या प्रशासकीय ईमारत परिसरात नागरिक व्यक्त करीत आहे.

प्रशासकीय इमारतीकडे जाणार्‍या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष**.                                             
Previous Post Next Post