गोपालखेड रस्त्याच्या दुरवस्थेवर जनशक्ती प्रहारचा आक्रमक पवित्रा – दोन दिवसांत दुरुस्तीची हमी.. (अकोट (प्रतिनिधी – निळकंठ वसू) दि. 23 सप्टेंबर रोजी दहीहंडा फाटा ते गोपालखेड जिल्हा मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाल्यामुळे प्रवाशांचे आणि नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. या गंभीर प्रश्नावर जनशक्ती प्रहार पक्षाचे अकोट तालुका जिल्हा उपाध्यक्ष जीवनभाऊ खवले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.रस्त्यावरील मोठमोठे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत असून, शालेय विद्यार्थ्यांपासून ते रुग्णवाहिका सेवेला देखील यामुळे अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भावना ओळखून येणाऱ्या दोन दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.जीवनभाऊ खवले यांची प्रतिक्रिया:"दहीहंडा फाटा ते गोपालखेड मार्ग हा शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य जनतेचा मुख्य मार्ग आहे. परंतु सध्या या रस्त्याची अवस्था दयनीय असून, खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. आम्ही वेळोवेळी तक्रारी करूनही दुर्लक्ष केले गेले. आता मात्र जनतेच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार आहे. जर दोन दिवसांत काम सुरू झाले नाही, तर जनशक्ती प्रहार तीव्र आंदोलन करेल."जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारने उचललेले पाऊल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0