.*रेडीमेड* कपड्याच्या वाढत्या वापरामुळे टेलर व्यवसाय संकटात.*{{ कारागीरासह व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ }}. *मानवत / वार्ताहर. { अनिल चव्हाण }आजच्या अधूनिक बदलत्या फॅशन यूगात व रेडिमेड बाजार पेठेच्या युगात गाव खेड्यातील पारंपारिक व्यवसाय धोक्यात आले आहेत.त्यातील एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे टेलरिंग सींपी काम पूर्वी प्रत्येक गावात *टेलर* हा आवश्यक घटक मानला जात असे घरातील लहान-मोठ्यासाठी कपडे शिवून घेणे ही परंपरा होती पण आज सहज उपलब्ध होणारे स्वस्त व आकर्षक रेडीमेड कपडे लोकांना अधिक सोयीचे व परवडणारे वाटू लागले आहेत. या बदलामुळे गाव खेड्यातील टेलर यांच्याकडे कामाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या कमी होत असल्याने अनेक टेलर लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधी ज्या टेलर कडे दिवसभर कामाचा ताण असे त्याच्याकडे आता दिवसात मोजकेच काम येते त्यामुळे या व्यवसायातून मिळणारा उत्पन्नाचा सोर्स जवळ जवळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे सामान्य व्यावसायीकांचा उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाल्याने अनेक टेलर लोकांना मजुरी, शेती, बांधकाम, किंवा छोट्या- मोठ्या नोकरीकडे वळावे लागत आहेत. पारंपारिक व्यवसाय असूनही टिकाव धरण्यास असमर्थ झाल्या मुळे गावागावात टेलरची दुकाने बंद पडताना दिसत आहे. त्यामुळे नवीन टेलर तयार होत नाहीत पूर्वी घरातील मुलांनी टेलरिंग शिकून दुकान चालवावे अशी परंपरा होती पण आता या धंद्यात भविष्य नाही अशी धारणा निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन पिढी टेलरिंग शिकण्यास इच्छुक नाही. तर गावांमध्ये नवीन टेलर तयार होत नसल्यामुळे हा व्यवसाय पूर्णत संपण्याच्या मार्गावर आहे. व जरी थोडीफार मागणी शिल्लक रेडीमेड कपड्याची मागणी जरी प्रचंड वाढली असली तरी लग्नसराईत, सणवार , पारंपारिक पोशाख यासाठी अजून ही टेलरकडे जाण्याची गरज भासते मात्र ही मागणी पुरेशी नसल्याने टेलर लोकांना यातून फारसा आधार मिळत नाही. त्यामुळे जर हा पारंपारिक व्यवसाय टिकवायचा असेल तर सरकारने व स्थानिक संस्थांनी शिंपी टेलर यासाठी कौशल्य विकास आधुनिक मशीन बुटींक प्रशिक्षण व बिनव्याजी कर्ज सुविधा शासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे टेलरचे दुकान हळूहळू ग्रामीण भागात वाढताना दिसतील.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0