शेतकऱ्याची नदीत उडी, संतप्त जमावाकडून तहसीलदारांना पाण्यात टाकण्याचा प्रयत्नव बैंकवाटरमुळे शेतीचे नुकसान झाल्याने शासनाकडून पंचनामा करण्यास यंत्रणा न आल्याने नदीत उडी घेत शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी जमावाने शेतकऱ्याला पाण्याबाहेर काढत घटनास्थळी दाखल झालेल्या नायब तहसीलदारांना पाण्यात टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला असला तरी या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ झाला होता. ही घटना धर्माबाद तालुक्यातील चोळाखा शिवारात १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.चोळाखा येथील शेतकरी संतोष लक्ष्मणराव कदम यांच्या शेतीचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. कधी बैंकवाटरचा त्रास, तर कधी पाऊस यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. २८ ऑगस्टपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचून आहे, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रशासनाकडून कुणीही येतनसल्याने उपरोक्त शेतकऱ्याने शेतातील नुकसानीचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकताना दखल न घेतल्यास १९ रोजी जलसमाधी घेणार असल्याचे घोषित केले होते.दरम्यान, कुणीही न आल्याने संतोष कदम यांनी शुक्रवारी चोंडी ते चोळाखा मार्गावरील पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. तेथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी पाण्यात उडी घेत कदम यांचा जीव वाचवला. दरम्यान, महसूलकडून नायब तहसीलदार गावंडे हे घटनास्थळी पोहोचले असता संतप्त झालेल्या जमावाचा उद्रेक झाला. पोलिस व१८ रोजी सोशल मीडियावरून दिला होता इशाराशेतकऱ्याऐवजी तुम्ही मरा असे म्हणत गावंडे यांना उचलून नदीत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाच्या तावडीतून गावंडे यांची सुटका केली. त्यानंतर तहसीलदार सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार गावंडे, धर्माबादचे पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर, सपोनि गणेश कराड, मुत्येपोड व पोलिस कर्मचारी गणपत गंधकवाड आदींनी जमावाला शांत केले.यावेळी तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी शेतकरी संतोष कदम यांची समजूत काढत आर्थिक मदतीचे आश्वासन यावेळी दिले.तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष

शेतकऱ्याची नदीत उडी, संतप्त जमावाकडून तहसीलदारांना पाण्यात टाकण्याचा प्रयत्नव बैंकवाटरमुळे शेतीचे नुकसान झाल्याने शासनाकडून पंचनामा करण्यास यंत्रणा न आल्याने नदीत उडी घेत शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. 
Previous Post Next Post