*प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची जयंती के.के.एम. महाविद्यालयात साजरी*. ( मानवत / वार्ताहर. (अनिल चव्हाण )—————————————— के.के एम महाविद्यालयात आज प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. जी हुगे उपस्थित होते. संयोजीका डॉ.सारिका सावंत यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला त्या म्हणाल्या की सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले.प्रा. सुनिता कुकडे, डॉ.एस. के. शिंदे,पर्यवेक्षक प्रा.अनिल कापसे प्रा.खोब्रागडे डॉ. सी पी व्यास उपस्थिती होते. प्रस्ताविक डॉ. सविता सावंत तर आभार सुनील कुकडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0