सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर फेगडे जिवनगौरव पुरस्काराने सन्मानित ! (!यावल तालुका प्रतिनिधी (रविंद्र आढाळे)प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी यांना शैक्षणिक कार्यकाळात घडविणारे ग्रामीण क्षेत्रातील सेवानिवृत मुख्याध्यापक सुधाकर आर फेगडे यांना नेशन बिल्डर या जिवन गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले आहे.तालुक्यातील सातोद येथील राहणारे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर आर फेगडे यांना शिक्षक म्हणुन शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सटाणा बालगण जिल्हा नाशिक यांच्या वतीने नेशन बिल्डर गौरव जिवनगौरव या पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले.सटाणा जिल्हा नाशिक येथील पं.ध.पाटील मराठा इंग्लिश स्कूल या ठीकाणी मा.आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली व बाल गाणचे तहसीलदार कैलास तावडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झालेल्या या सन्मान पुरस्कार कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणुन दिलीप दळवी,डॉ प्रशांत सोनवणे,शालनाताई सोनवणे,अरूण पवार यांच्यासह आदी मान्यवर हे उपस्थित होते.जिवनगौरव पुरस्कार प्राप्त सुधाकर फेगडे यांचा त्यांचे चिरंजिव यावलचे माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे यांच्यासह समाज बांधवांकडून सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0