आनंदवन येथे श्रद्धेय बाबा आमटे समाधी दर्शनाने रवींद्र शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात.. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.13:- वरोरा:-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूरचे अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त समाजसेवेचा संकल्प करत आनंदवन येथे श्रद्धेय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली.या प्रसंगी शिंदे यांच्यासोबत प्रा. धनराजजी आस्वले व मित्रपरिवार उपस्थित होते. त्यांनी थोर समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांच्या समाधीला वंदन केले तसेच डा. विकासजी आमटे व डा. भारती आमटे यांची भेट घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सौ. पल्लवी आमटे देखील उपस्थित होत्या.त्यानंतर आनंदवन येथील 200 हून अधिक कुष्ठरोगी रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी डा. पोळ, सुधाकर कडू, जयंत टेंभुर्डे, राजेश ताजने, धनराज अस्वले (काका), डॉ. वजे, राजीव मिश्रा, खेमराजजी कुरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.📍 आनंदवन ग्रामपंचायत भेटआनंदवन ग्रामपंचायतीच्या वतीने अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि समाजसेवेच्या कार्यात सतत सहभागी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.📍 वरोरा उपजिल्हा रुग्णालयात फळवाटपयानंतर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भारतीय जनता पार्टी व ट्रस्टच्या वतीने फळवाटप करण्यात आले. या प्रसंगी विधानसभा प्रमुख डॉ. रमेश राजुरकर, ट्रस्टचे कार्यवाहक, भाजपा वरोरा शहराध्यक्ष संतोष पवार, बँकेचे संचालक जयंत टेंभुर्डे, तसेच बाजार समिती संचालक बाळूभाऊ भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व उपक्रमांतून मा. रवींद्र शिंदे यांनी समाजातील दुर्बल घटकांप्रती असलेली बांधिलकी व सेवाभाव अधोरेखित केला.
byMEDIA POLICE TIME
-
0