युवतींनी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे -डॉ.अमिता महाजन.. . (रावेर जळगाव सानिया तडवी- )कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभाचे उद्घाटन रावेर येथील दृष्टी हॉस्पिटलचे डॉक्टर अमिता महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,ग्रामीण भागातील युवती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.यातून गुंतागुंतीच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.सुदृढ परिवारासाठी युवतींचे मानसिक आरोग्य चांगले राहील याची काळजी कुंटुबाने घ्यावी. कुटुंबाला आरोग्य दृष्ट्या सक्षम करण्यामध्ये महिलांची भूमिका अतिशय महत्त्वाचे असते.नवीन काळामध्ये नव्या प्रकारच्या आजारांची भर पडत आहे.महिलांच्या आयुष्यात खूप सारे आव्हाने आहेत.महिलांनी या आव्हानांचा सक्षमपणे सामना करावा असे मत डॉक्टर अमिता महाजन यांनी मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील हे होते. त्यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर स्वाती राजकुंडल यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर गणपतराव ढेंबरे यांनी केले.या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.एस.डी. धापसे,डॉ.नीता जाधव हे उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आयोजित केला होता.मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभागा तर्फे करण्यात आले होते.
byMEDIA POLICE TIME
-
0