सेलूत पिकविम्या पासून वंचित शेतकऱ्यांचा आक्रोश. .मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची निवेदनाद्वारे मागणी. (परभणी जिल्हा प्रतिनिधी शिवाजी शिंदे)सेलू : शेतकऱ्यांचा 2024 या वर्षातील खरीप हंगामाचा पिक विमा मंजूर झालेला असतानाही केवळ न . प . हद्दिचे जुजबी कारण देत आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचीत ठेवले. मंजूर झालेला पिक विमा मिळावा या साठी अतिवृष्टीने पिचलेल्या सेलूतील शेतकऱ्यांनी आक्रोश करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे .सन 2024 च्या खरीप हंगामात सेलू तालुक्यात निसर्गाच्या लहरी पणामुळे पाऊसच न पडल्यामुळे उभी पिके वाळून गेली व हाता तोंडाशी आलेला खरीपाचाहंगाम हिरावला गेला.शेकडो शेतकऱ्यां नी पिक विमा काढून, ई पिक पाहाणी, पिकांचा स्पॉट पंचनामा अशा पिकविम्याच्या मंजूरीसाठी असलेल्या सर्व नियम अटी पूर्ण केल्यामुळे पिक विमा मंजूरही झाला, नतध्रष्ट विमा कंपनीने सेलू शिवार न.प. हद्दीत येत असल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना पिकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवले. तालूका कृषी अधिकारी, तहसिलदार , उपविभागीय अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी ,कृषी उपसंचालक यांना या बाबत शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी केली.जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबत जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना पिकविमा तात्काळ आदा करण्याचे आदेशही दिले होते परंतू मंजूर पिकविम्याचे घोडे नेमके का ? व कोणी ? अडवले हे कोडे मात्र अद्यापही उलगडत नसल्यामुळे आणि नुकत्याच अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या मोठ्या नुकसानीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे उपविभागीय अधिकाऱ्यां मार्फत निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड न केल्यास ऐन दिवाळीत जिल्हा धिकारी कार्यालयासमोर लोक शाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालक मंत्र्यांच्या मतदार संघात आय सी आय सी आय लोंबार्ड या विमा कंपनीने खरीप २०२४ चा पिक विमा मनमानी कारभार करून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचीत ठेवलेल्या कंपनीवर पालक मंत्र्यांनीही कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.निवेदनावर शिवकुमार नावाडे , विशाल लोया, चेतन फोपसे, सुभाष फोपसे ,अरुण फोपसे, बापुसाहेब शेरे, महादेव शेरे, बबन शेरे, गोविंद शेरे, अश्वीन लोया , शाम शेरे , देवेंद्र नावाडे नितीन कुलकर्णी , वाकणकर ऋषीराज , गजानन झमकडे , शिवराज सोळंके ,प्रितेश लोया आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सेलूत पिकविम्या पासून वंचित शेतकऱ्यांचा  आक्रोश.         .मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची निवेदनाद्वारे मागणी.                         
Previous Post Next Post