**मानवत शहरातील खेळाडूंना आत्मरक्षणासाठी कराटेचे बळ –* (मानवत / वार्ताहर.{अनिल चव्हाण }*—————————————*मानवत शहरातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन व आत्मरक्षणासाठी नवे बळ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कराटे किट उद्घाटन सोहळ्याचा उत्साहवंत कार्यक्रम गालिब नगर येथील कुरेशी मंगल कार्यालयात पार पडला. सविस्तर वृत्त असे की, बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी असिर मास्टर यांच्या कराटे क्लबच्या वतीने हा सोहळा पार पडला.या सोहळ्याचे उद्घाटन डाॅ. अंकुशराव लाड यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे मार्गदर्शन धर्मगुरू मौलाना सुलतान मिल्ली यांनी केले. यावेळी कराटे खेळाडूंना देण्यात आलेली ही किट त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणारी ठरेल, असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद अबरार इलाही (महाराष्ट्र अध्यक्ष, राज बेलदार समाजसेवा मंडळ), मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर पाटील , वॉईस ऑफ मीडिया चे अध्यक्ष कचरूलाल बारहाते, मगदूम भाई बेलदार, सय्यद जमील, युवा नेते अभिषेक अळसपुरे,दत्ता चौधरी, हाजी रफिक कुरेशी, माजिद इनायत शेख,नियमात खान, मोहन लाड, राजकुमार खरात, ज्ञानेश्वर मोरे, किरण बारहाते, हबीब भडके, अफसर अन्सारी, अब्दुल गफुर कुरेशी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन विलास खरात यांनी केले, तर मान्यवरांचे आभार मास्टर असिर खान यांनी मानले. कार्यक्रमात कराटे खेळाडूंनी सादर केलेल्या विविध डेमोने प्रेक्षकांची दाद मने जिंकली.डाॅ. अकुंशराव लाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी ते म्हणाले “शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मसंरक्षणासाठी महत्त्वपूर्ण मानला जाणारा कराटे खेळ आज ग्रामीण भागातही लोकप्रिय होत आहे. मानवत तालुक्यातील अनेक विद्यार्थी कराटे प्रशिक्षण घेत असून त्यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली आहे. कराटे हा खेळ केवळ खेळ म्हणून नव्हे, तर आत्मसंरक्षणाची प्रभावी पद्धत आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून या खेळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.”कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी मास्टर बालाजी शिंदे, मास्टर सुरेश देवर्षी, मास्टर नवनाथ मुळे, मास्टर रमेश सत्वधर यांनी विशेष मेहनत घेतली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या उपक्रमामुळे मानवत शहरातील कराटे खेळाडूंना नव्या संधींचे व्यासपीठ मिळाले असून युवा वर्गामध्ये शिस्त, आत्मविश्वास व क्रीडावृत्ती विकसित होण्यास हातभार लागणार आहे.*भाऊ बातमी पाठविली आहे.*

मानवत शहरातील खेळाडूंना आत्मरक्षणासाठी कराटेचे बळ –*                                                                      
Previous Post Next Post