भारतीय जनता पार्टी भद्रावती तालुका व शहर द्वारा दिवाळी निमित्त कार्यकर्ते व पदाधीकारी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन*. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.31:- श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे आदरणीय श्री हंसराजजी अहिर साहेब अध्यक्ष केन्द्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी केन्द्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी भद्रावती तालुका व शहर द्वारा दिवाळी निमित्त कार्यकर्ते व पदाधीकारी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वरोरा-भद्रावती विधानसभा आमदार मा. करणजी देवतळे, भाजप नेते डॅा. अशोकजी जिवतोडे, चंद्रपूर जिल्हा बॅंक अध्यक्ष मा. रविंद्रजी शिंदे, विधानसभा प्रमुख मा. रमेशजी राजूरकर, जेष्ठ नेते मा. अशोकजी हजारे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट अध्यक्ष प्रा. धनराजजी आस्वले, भद्रावती ग्रामिण अध्यक्ष श्री श्यामसुंदर उरकुडे, श्री दयानंद जांभूळे, शहर अध्यक्ष श्री सुनिल नामोजवार, महिला अध्यक्षा रक्षीता निरांजने, शहर अध्यक्षा वृषाली पांढरे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भद्रावती कृउबास सभापती राजू डोंगे, भद्रावती प.स. माजी सभापती ठेंगणे, भद्रावती कृउबास उपाध्यक्ष अश्लेषा जिवतोडे भोयर, भद्रावती न.प. माजी उपाध्यक्ष संतोष आमणे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष पाम्पट्टीवार तसेच भद्रावती ग्रामिण व शहर पदाधिकारी कार्यकर्ते (सर्व विंग) मोठ्या संख्येने उपस्थीत होते.कार्यक्रमाचे संचालन श्री पांढरे सर व आभार प्रदर्शन श्री पाम्पटीवार साहेब यांनी केले. स्नेहभोजनासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
byMEDIA POLICE TIME
-
0