📰 शैक्षणिक क्षेत्रात उतरून कामगिरी करावी अशी अपेक्षा : अश्विनभाऊ तावडे (युवा उद्योजक). (हिंगणघाट (प्रतिनिधी) — स्थानिक तसेच ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी खास प्रयत्नांची गरज आहे. सामाजिक जाण असलेल्या संस्थांनी शैक्षणिक क्षेत्रातही पाऊल ठेवावे, अशी अपेक्षा प्रसिद्ध युवा उद्योजक अश्विनभाऊ तावडे यांनी व्यक्त केली आहे.तावडे यांनी सांगितले की, आता जर त्यांनी आधुनिक शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट, आणि विद्यार्थ्यांना नवी दिशा देणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले तर ग्रामीण महाराष्ट्रात मोठा बदल घडू शकतो.”त्यांच्या मते, “आजच्या काळात ज्ञान आणि रोजगार यांचा संगम साधणारे शिक्षण आवश्यक आहे. ज्या ग्रुपकडे योग्य दृष्टीकोन आणि सामाजिक बांधिलकी आहे, त्यामुळे ते हे कार्य ते उत्कृष्टरीत्या करू शकतील, असा मला विश्वास आहे.”तावडे यांनी पुढे सांगितले की, “हिंगणघाट, वर्धा आणि आसपासच्या भागात अनेक तरुणांना मार्गदर्शनाची व संधीची गरज आहे. जर शैक्षणिक अकादमी, प्रशिक्षण केंद्रे आणि डिजिटल शिक्षण प्रणाली उभारेल, तर ती या भागातील तरुणाईसाठी नवसंजीवनी ठरेल.
byMEDIA POLICE TIME
-
0