जागृती गुरुकुल विद्यालय होट्टल चे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय आर्य महासम्मेलनमध्ये, दिल्ली येथे एकूण १५० विद्यार्थी यांंचा सहभाग. देगलूर जि. नांदेड़ आंतरराष्ट्रीय आर्य महासम्मेलन, दिल्ली येथे जागृती गुरुकुल विद्यार्थ्यांचा सहभाग. दिनांक, ३० ऑक्टोंबर २०२५ ते ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे होणाच्या आंतरराष्ट्रीय आर्यमहासमेलनासाठी जागृती गुरूकुल विद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांची विविध उपक्रमासाठी निवड करून निमंत्रीत करण्यात आले आहे. यापैकी १५० विद्यार्थी यांचे प्रस्तान आज होइल चालूक्य नगरीतील जागृती विद्यालय आणि जनजागृती विद्यालय चे मुख्यध्यापक श्री गोपाळ नाईक सर आणि संस्थापक रामराव नाईक सर आणि उपस्थित विद्यार्थी यांचे पालक शिक्षक वृंद यांच्या उपस्थित मध्ये हरी झेंडी दाखवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेया आर्य महासंमेलनाचे उद्घाटन मा. श्री पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होणार असून यासाठी देशातील व विविध देशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपल्या विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यात सहभागी होणार असून या मध्ये बासरी बादन, सर्वांगसुंदर व्यायाम, सुर्य नमस्कार, चंद्रनमस्कार, भुमिनमस्कार, दंडबैठक, नियुध्दम, योगासने, प्राणायम, डंबेल, लेझिम, दांड पट्टा, ढाल तलवार बाजी, लाठी, भाला, मलखांब, रोपमलखांब व अप्रिचक्र इ. शिवकालीन शौर्य उपक्रम दाखवतील. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नांदेड ते दिल्ली जाण्या-येण्याचा रेल्वे रिझर्वेशन तिकीटाचा खर्च व दिल्ली येथे ३-४ दिवस राहण्याचा व जेवणाचा खर्च आर्य महासंमेलन समिती मार्फत करण्यात येणार आहे. तसेच प्रदर्शनासाठी लागणारा गणवेश (ड्रेस) मोफत दिला जाणार आहे. या भव्य आंतरराष्ट्रीय महासंमेलनात सहभागी होऊन विविध उपक्रम सादर करण्याची संधी आपल्या विद्याव्यर्थ्यांना मिळालेली आहे.या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्राचीन काळातील स्वराज्य आणि पराक्रमाचे दर्शन घडवणार असून, या प्रकारचा सांस्कृतिक व शारीरिक प्रशिक्षणाचा संगम त्यांना दिला जात आहे. ढाल तलवारबाजी आणि लाठी या पारंपरिक युद्धकौशल्यांमध्ये विद्यार्थ्यांचे कौशल्य दिसून येणार आहे. भाला सादर करताना विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञतेची दखल घेतली जाईल. मलखांब आणि रोपमलखांब हे महाराष्ट्रातील पारंपरिक लढाई आणि शौर्य कलाअसून, त्यांमध्ये विद्याथ्यर्थ्यांची समन्वय, शक्ती व स्फूर्ति यांचा अभ्यास होतो. योगासने, दांडपट्टा आणि दंडबैठक या योग व व्यायामाच्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य वृद्धिंगत होत आहे.जागृती गुरुकुल विद्यालय, होट्टल ही संस्था शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जागृती या तीन पायांबर उभी असून, गेल्या काही वर्षांत तिचा प्रतिष्ठेचा गजर दूरवर ऐकू येत आहे. या वर्षी दिल्ली येथे पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्य महासम्मेलनात संस्थेच्या १५० विद्याव्यर्थ्यांनी सहभाग घेतला. हे विद्यार्थी फक्त विद्यार्थी नाहीत, तर सतत प्रगती करणाऱ्या या संस्थेचे जिवंत प्रतीक आहेत.जागृती गुरुकुल विद्यालय, होइल या छोट्या खेडेगावातून सर्वसामान्यांसाठी शिक्षणाचा दिवा पेटवणाऱ्या संस्थेच्या एकूण १५० विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय आर्य महासम्मेलनात सहभाग घेतल्याची बातमी गर्दीत आहे. हा सहभाग केवळ मराठवाडयातील शैक्षणिक संस्थांच्या उपलब्धीच पराकाष्ठा दाखवतो, तर भारतातील आर्य समाज व त्याच्या शैक्षणिक विचारसरणीचे सशक्त संदेश देखील पोहोचवतोतालूका प्रतीनीधी उमाकांत मठपती देगलूर

जागृती गुरुकुल विद्यालय होट्टल चे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय आर्य महासम्मेलनमध्ये, दिल्ली येथे एकूण १५० विद्यार्थी यांंचा सहभाग.                                                                                          
Previous Post Next Post