*आमदार मा. राजेश बकाने साहेब यांची “आई रेणुका चिवडा सेंटर” ला अचानक भेट...** कच्चा चिवड्याचा आस्वाद घेत व्यवसायाच्या प्रगतीचे कौतुक... (वर्धा जिल्हा प्रतिनिधी:-(अब्दुल कदीर) देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. राजेश बकाने साहेब यांनी आज देवळी शहरातील प्रसिद्ध व लोकप्रिय “आई रेणुका चिवडा सेंटर” ला अचानक भेट देऊन चिवड्याचा आस्वाद घेतला. या भेटीदरम्यान आमदार बकाने साहेबांनी दुकानातील चिवड्याच्या विविध प्रकारांची पाहणी केली. त्यांनी “आई रेणुका चिवडा सेंटर” चे संस्थापक अशोक पारीसे तसेच मार्गदर्शक रविंद्र पारीसे, पवन पारीसे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या व्यवसायातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या अचानक झालेल्या भेटीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील नागरिक, व्यापारी वर्ग व युवक कार्यकर्ते या भेटीदरम्यान उपस्थित होते. आमदारांच्या या सौजन्य भेटीमुळे “आई रेणुका चिवडा सेंटर” बद्दल शहरभर कौतुकाची लाट पसरली आहे. *आमदार बकाने साहेबांनी स्वतः कच्चा चिवडा चाखून त्याच्या गुणवत्तेचे व स्वादाचे विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी सांगितले की — “स्थानिक पातळीवर उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ तयार करून व्यवसाय वाढविणे हा आत्मनिर्भरतेचा उत्तम आदर्श आहे. अशा उद्यमशील तरुणांनी स्थानिक उद्योगांना नवे बळ दिले आहे.”*
byमीडीया पोलीस टाईम
-
0