*नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात आनंददायी शनिवार साजरा.**. (मानवत / प्रतिनिधी.**)——————————*मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये आज आनंदयी शनिवार साजरा करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की,शिक्षण विभागाच्या आदेशा वरून राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून परभणी जिल्हात शिक्षणाधिकारी ( प्रा ) मा. सुनिलजी पोलास व मानवत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मा. मनोजजी चव्हाण यांच्या कुशल व यशस्वी मार्गदर्शनाखाले शिक्षण विभागाच्या माध्यमातून शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत असून आज आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या माध्यमातून येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाले विद्यालयात स्वच्छता मोहिम, परिसर स्वच्छ व माझे कार्यालय माझी शाळा उपक्रम राबवून शाळा परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सखी सावित्री समितीच्या वतीने तक्रार पेटी उघडण्यात आली. तक्रार पेटीत तक्रार निरंक असल्याची शहानिशा करण्यात आली. यावेळी पालक प्रतिनिधी वैशालीताई प्रदिप अंभोरे,ज्योतिताई सोमेश्वर राऊत, मनकर्णा अमृतराव रामपूरकर श्रीमती सोनालीताई माने , बी.एस. गोन्टे, एस.एन.कच्छवे. ई.व्ही.मुळे. सुरेखाताई चंदाले, संगीताताई थोरे, बाबासाहेब तेलभरे, सुबान शहा , कैलासजी अबूज, वैभव होगे, आदी सह शालेय विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.आजचा आनंददायी शनिवार विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आल्याने शासनाच्या विविध शालेय व विद्यार्थी सहभाग उपक्रमामुळे विद्यार्थ्यासह शालेय प्रशासनामध्ये खरा आनंद व्यक्त होत आहे. शिक्षणाधिकारी सुनिल पोलास यांच्या दूरदृष्टी निश्चयामुळे विविध उपक्रम व गटशिक्षणाधिकारी मनोज जी चव्हाण यांचे कूशल संघटन व प्रशासनावरील पकड यामुळे तालूक्यातील केंद्रप्रमुख यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे शैक्षणिक आलेख वाढत असून दररोज विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.**

नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात आनंददायी शनिवार साजरा.**.                                                                
Previous Post Next Post