*रोठा येथे महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंती व आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा....** सत्य, अहिंसा, समता व शिस्तीच्या विचारांचा गावकऱ्यांनी केला संकल्प; वृक्षारोपणातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश...वर्धा प्रतिनिधी:-भारताला सत्य, अहिंसा व एकतेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, “जय जवान जय किसान”चा नारा देणारे आदर्श पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि भारताचे संविधान निर्माता व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून रोठा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुरुवातीला गांधीजी, शास्त्रीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याची आठवण करून देत गावकऱ्यांनी त्यांच्या विचारांचे स्मरण केले. त्यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी योद्धा अमोल ठाकरे, सहकारी सोसायटी अध्यक्ष मुकेश आळसपुरे, सामाजिक कार्यकर्ता अमृत शेंद्रे, सुरेश खोडे, अतुल शेंद्रे, उपसरपंच सुभाष सयाम, आशिष कोल्हे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते. गावकऱ्यांनी एकमुखाने गांधीजींच्या सत्य व अहिंसेच्या तत्त्वांचा, शास्त्रीजींच्या शिस्त व साधेपणाचा आणि बाबासाहेबांच्या समतेच्या व शिक्षणाच्या विचारांचा अवलंब करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक ऐक्य व पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
byMEDIA POLICE TIME
-
0