दिवाळी नंतर आता निवडणुका ची धामधूम _____________________________. संजय भरदुक (मीडीया पोलीस टाईम)विशेष जिल्हा प्रतिनिधी वाशिम _____________________________वाशिम-- राजकीय पारा लागला चढू ; जिल्ह्यात लागली चढाओढ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दंड थोपटले आहेत मात्र यावेळी नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये राजकीय पारा चढतो आहे . नगरपरिषद, जिल्हापरिषद, पंचायत समिती, पंचायतराज (ग्राम पंचायत) मध्ये निवडणुकीचा बिगुल वाजण्याची प्रतिक्षा असतांनाच राजकीय पक्षांना हालचालींना वेग आला आहे,शहरी भागातील प्रभागात विकासकामे सुरू केली आहेत तर इच्छूक उमेदवारांनी दिवाळीच्या भेटीला प्राधान्य देण्यात व फराळाचा आस्वाद देऊन आपली उमेदवारी ची पेरणी करण्यासाठी इच्छुक दिसत आहे अशी जनतेमध्ये चर्चा व जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तसेच ग्रामीण भागातील सर्कल परिसरात व पंचायत समिती गणामध्ये सुध्दा प्रचार व प्रसिद्धी मिळावी यासाठी उमेदवार आपआपल्या परीने प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत तर दुसरीकडे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपला हक्काची जागा आरक्षण अपेक्षा वर पाणी फिरले आहे त्यामुळे काहीची नाराजी व्यक्त करत आहेत किंवा इतर ठिकाणी आपले नशीब आजमावून पाहावे लागणार आहे इतर ठिकाणी जुळवाजुळव चे गणित बसवावे लागणार आहेत.तसेच आपआपल्या पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये ताळमेळ बिघडत असल्याने काही बंडखोरीच्या प्रयत्नात असलेले दिसून येते आहे तर काही महिला आरक्षण निघाल्यामुळे महिलांना पुढे करत निवडणूकीसाठी सज्ज केले आहे .सर्वच राजकीय पक्षांना मतदाराजांना आपल्या परीने त्यांची मने जिंकून वढवण्याची चढाओढ लागली असून साम,दाम,दंड,भेद आजमावून पाहत आहेत.आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चढाओढ लागली आहे मत वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे.परंतू शेतकरी किंवा नागरिकांच्या हितासाठी कोणत्याही पक्षाने ठोस असे निर्णय घेतलेले नाही. वर्षेनुवर्ष शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे निवडणुका आल्या की शेतकरी आठवतो आणि तसं वातावरण निर्माण केले जाते पण यावेळी चित्र थोडे बदलणार आहे मतदार राजा ही आता हूशार झाला आहे ते सुद्धा राजकीय पक्षांना व उमेदवार लोकांना ओळखून आहे आणि आपल्या कामाचा व विकासालाच प्राधान्य देणारा उमेदवार शोधत आहे .
byMEDIA POLICE TIME
-
0