आज दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी हिंगणघाट येथे भव्य अशा सांस्कृतिक सभागृह (नाट्यगृह) बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण पार पडला. या प्रकल्पासाठी तब्बल १७ कोटी रुपयांचा भरघोस निधी प्राप्त करून हिंगणघाट शहराला सांस्कृतिक वैभवाची नवी ओळख मिळाली आहे. मा ना श्रीमान आमदार समीर भाऊ कुन्नावार साहेब यांचे शुभ हस्ते भूमिपूजन पार्पडलेला आहे या नाट्यगृहाची विशेष बाब म्हणजे, येथे १००० आसनक्षमतेचे अत्याधुनिक सभागृह उभारले जाणार आहे. प्रशस्त आणि सुसज्ज अशा या नाट्यगृहात अत्याधुनिक ध्वनी-प्रकाश व्यवस्था, वातानुकूलित प्रेक्षागृह, कलाकारांसाठी स्वतंत्र तयारी कक्ष, आणि पर्यावरणपूरक बांधकाम या सर्व आधुनिक सोयीसुविधांचा समावेश असेल.या भूमिपूजन सोहळ्याला मा. माजी खासदार रामदासजी तडस, मा. कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट चे सभापती सुधीर बाबू कोठारी, माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बसंतानी, माजी नगराध्यक्ष निलेशजी ठोंबरे, मुख्याधिकारी न. प. हिंगणघाट प्रशांतजी उरकुडे विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.हिंगणघाट हे शिक्षण, उद्योग आणि सामाजिक उपक्रमांसाठी ओळखले जाणारे शहर आहे. मात्र, स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी योग्य व्यासपीठाची आवश्यकता होती. हे १००० आसनक्षमतेचे सांस्कृतिक सभागृह त्या गरजेला उत्तम प्रतिसाद देईल. या प्रकल्पामुळे येथील नाट्यसंघ, सांस्कृतिक संस्था आणि युवकांना सर्जनशीलतेचा नवा मंच मिळणार आहे.या सभागृहाच्या उभारणीमुळे हिंगणघाट शहर सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, आणि विदर्भातील नाट्य-कलासृष्टीसाठी हे ठिकाण एक प्रमुख केंद्र ठरेल. आजचा हा दिवस हिंगणघाटच्या विकासाच्या आणि सांस्कृतिक प्रगतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल!मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byMEDIA POLICE TIME
-
0