श्रुती विजय मोरे यांची विद्युत सहाय्यक पदी नियुक्ती. (धर्माबाद (वार्ताहर) फुलेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय रामचंद्र मोरे यांची कन्या कुमारी श्रुती विजय मोरे हिची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी च्या कल्याण (मुंबई) झोन येथे विद्युत सहाय्यक पदी नियुक्ती झाली आहे. अतिशय बेताच्या परिस्थितीतही जिद्द व चिकाटीच्या जोरावर ध्येय साध्य करता येते हे श्रुती विजय मोरे हिने दाखवून दिले आहे. दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद येथून पूर्ण केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथून तारतंत्री हे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सी टी आय एस कॅम्पस चेन्नई येथून सी. टी. आय. डिप्लोमा पूर्ण केला व कलावतीबाई चव्हाण प्रशिक्षण संस्था नायगाव तसेच ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे निदेशक (इन्स्ट्रक्टर) म्हणून काम केले. महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या वतीने मे 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत श्रुती विजय मोरे पास झाल्याने तिचे नियुक्ती कल्याण झोन मध्ये झाली आहे. तिच्या नियुक्ती बद्दल मित्र-मैत्रिणी, आप्तेष्ट यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

श्रुती विजय मोरे यांची विद्युत सहाय्यक पदी नियुक्ती.         
Previous Post Next Post