गिरड येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी व औषधाचा अभाव: रुग्णांची हेळसांड: तातडीने रीक्त पदे भरण्याची मागणी .. (वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर)समुद्रपुर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या गिरड येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव व अपुऱ्या औषधी साठ्यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे.यामुळे संबंधित जिल्हा आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याठिकाणी रीक्त असलेली पदे तातडीने भरावी अशी मागणी करण्यात आले आहे.याठिकाणी औषधी वितरण १ आरोग्य सेविका ३ शिपाई २ असे एकूण ६ पदे रिक्त आहे. गिरड हे गाव तालुक्यात लोकसंख्येने सर्वाधिक जास्त आहे.यातच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला परीसरात मोठ्या प्रमाणात गावे जोडली आहेत सध्या वातावरणाच्या बदलामुळे नागरीकांना अनेक आरोग्य विषयक समस्यांना समारोप जावे लागत आहे.यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र याठिकाणी औषधी वितरण १ आरोग्य सेविका ३ शिपाई २ असे एकूण ६ पदे रिक्त असल्याने याचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसत आहे.औषधी वितरण नसल्याने येथील कर्मचाऱ्यांनाच रुग्णांना औषधी द्यावे लागते आहे या सर्व बाबी अत्यंत गंभीर आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात अपुरा औषधीसाठा येथील डॉक्टर व रुग्णांसाठी मनस्ताप ठरत आहे. यामुळे अनेक रुग्णांवर खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्याची वेळ आली आहे.येथील रुग्णांची कर्मचाऱ्याच्या अभावामुळे तसेच अपुऱ्या औषधीसाठ्याने होत असलेली हेळसांड लक्ष घेऊन याची तातडीने वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येथील समस्या दूर कराव्या अशी मागणी गिरडचे सरपंच राजु नौकरकर,उपसरपंच मंगेश गिरडे, मोहगांवचे सरपंच विलास नवघरे,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ महैश गौर, माजी पंचायत समिती सदस्य शेख ईस्राईल, ग्रामपंचायत सदस्य अमोल पर्बत, राहुल गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य फकिरा खडसे, माजी ग्रामपंचायत सदस्य हमिद पटेल, शिवसेना उबाठा तालुका प्रमुख प्रभाकर चामचोर यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. प्रतिक्रियाउपसरपंच मंगेश गिरडेगिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव व अपुऱ्या औषधी साठ्याची माहिती रुग्णांकडून प्राप्त होताच आम्ही याठिकाणी जाऊन सततेची पडताळणी केली असा याठिकाणी ६ कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त असल्याचे व खरोखर औषधी साठा अपुरा असल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच औषधी वितरण नसल्याने येथील कर्मचाऱ्यांनाच रुग्णांना औषधी द्यावे लागते आहे या सर्व बाबी अत्यंत गंभीर आहे. आठ दिवसात याकडे लक्ष दिले नाही तर ना ईलाजाने ठोस पावले उचलावी लागणार आहे.

गिरड येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी व औषधाचा अभाव: रुग्णांची हेळसांड: तातडीने रीक्त पदे भरण्याची मागणी ..                                                         
Previous Post Next Post