जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा तर्फे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन... (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.15:- जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा यांच्या वतीने पुरुषांसाठी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हंसराजभैय्या अहिर (अध्यक्ष – राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली) होते.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा. करणजी देवतळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माझ्यासह विधानसभा प्रमुख मा. रमेशजी राजूरकर साहेब, विधानसभा संघटक मा. किशोरजी बावणे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा. दिवाकरराव पावडेजी, मा. उमेशजी बोडेकर, सौ. अमृताताई सुर, मा. रवींद्रजी धोटे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.या कबड्डी स्पर्धेचे आयोजन जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा यांच्या सर्व सदस्यांनी अत्यंत उत्कृष्ट व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा

जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा तर्फे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन...                                                                                   
Previous Post Next Post