परभणी कारागृहामध्ये आंतरराष्ट्रीय मानवीहक्क दिन साजरा* *. ( मानवत प्रतिनिधी / अनिल चव्हाण )*———————————परभणी येथील कारागृह वर्ग 2 मध्ये दिनांक 10 डिसेंबर बुधवार रोजी सकाळी 11 वाजता आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मा.मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्या सहमतीनुसार मा. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हक्क आयोग यांच्या आदेशानुसार 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने 10 डिसेंबर बुधवार रोजी सकाळी 11 वाजता परभणी जिल्हा कारागृह वर्ग 2 मध्ये. श्री संजयसिंह चव्हाण जिल्हाधिकारी तथा न्याय दंडाधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी श्री भूषण काळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी, श्री राजेंद्र मरळे अधीक्षक जिल्हा कारागृह परभणी, श्रीमती स्वाती जाधवर तुरुंग आधिकारी, ऍड लायबा बेग, ऍड वामन वाघमारे, विधी सेवा प्राधिकरण परभणी, राजेंद्र मंगरूळकर यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला.या निमित्ताने कायद्यांची मानवी हक्क आणि संरक्षण या विषयावर न्यायालयीन बंदी यांना वरील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत सोनसुळे, शिवाजी जोगदंड, नामदेव पोले, प्रमोद तारे, जुने वाहब शेख, गजानन बेले, वर्षा खंदारे, आरती खाडे, अक्षय थाटकर,जुनेद खान, कपिल नरंगळे, किरण माने, नारायण घुले,सचिन कोरके, विश्वास गाडे, गोपाळ सुरकुटवार, बालाजी अमृतवार, नंदकिशोर शिंदे आदींनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0