भद्रावती पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; 2 लाख 76 हजारांचा मुद्देमाल हस्तगत - दोन आरोपी जेरबंद... (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.9 :- पोलीस ठाणे भद्रावती येथे अप क्रमांक 545/25 कलम 303(2), 317(2), 3(5) भारतीय न्याय सहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यातील चोरटे अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकले. दि. 25/09/25 रोजी फिर्यादी पंकज राजकुमार देवतळे (वय 29 वर्ष, रा. जेना, ता. भद्रावती) यांनी तक्रार दिली होती की, त्यांच्या ठिकाणाहून बैलबंडीचे चार लोखंडी सामान किंमत 16,000 रुपये तसेच दोन ट्रॅक्टरचे पाच हायड्रोलिक लोखंडी पट्टे किंमत 10,000 रुपये असा एकूण 26,000 रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या काळोखात लंपास केला.तोंडी फिर्यादीवरून भद्रावती पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान चोरीचा मुद्देमाल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 2,76,000 रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्यामध्ये 1) बैलबंडीचे चार लोखंडी सामान -16,000 रुपयाचे, 2) ट्रॅक्टरचे पाच हायड्रोलिक पट्टे-10,000 रुपये , 3) गुन्ह्यात वापरलेली फोर्ड फिगो चारचाकी क्र.MH-34-AM-2618 2,50,000 रुपये ही चोरी आरोपी विनोद उर्फ बिल्लू देवगडे वय 58 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड, भद्रावती, वैभव महादेव दगडी वय 29 वर्ष, रा. जेना, ह.मु. महाकाली मंदिर, भिवापूर वार्ड, चंद्रपूर यांनी केल्याचे निष्पन्न झाले असून दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री संतोष बाकल (उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा) यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली भद्रावती पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.ही कारवाई पोलीस ठाणे भद्रावती व गुन्हे शाखेतील पो. उपनिरीक्षक गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, अनुप अस्तुंकर, विश्वनाथ चुधरी, गोपाल आतकुलवार, योगेश घाटोळे, रोहित चिडगिरे, खुशाल कावळे, संतोष राठोड यांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वी झाली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0