एम एल एल पी ए तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ! औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर दिनांक ६ डिसेंबर २०२५ ; मराठवाडा लेबर लाॅ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ( एम एल एल पी ए ) तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याबाबत असे की, दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त असोसिएशन तर्फे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याप्रमाणे यावर्षी ज्येष्ठविधीज्ञयतीन ठोले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना देऊन भारताच्या उभारणीची पायाभरणी केली अशा शब्दात गौरवोद्गार ठोले यांनी काढले.असोसिएशनचे अध्यक्ष अॅड सागरदास मोरे यांनी अध्यक्षीय समारोपात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठीचे आवाहन उपस्थित वकिलांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक असोसिएशनचे सेक्रेटरी अँड अभय टाकसाळ यांनी केले. आभार प्रदर्शन असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड अनिल सुरवसे यांनी केले. यावेळी जेष्ठ विधीज्ञ अँड जे एस भोवते, अँड. एस आर बोधडे, अँड. आनंद कांबळे, अँड . रुपेश बोर्डे, अँड . शिंदे व्ही.एल., अँड .राजेश कोटकर, अँड. आशिष देवरे, अँड .डी. एच. शेख, अँड.खंसारे टी. टी., अँड . संकेत जोशी, अँड .अशोक उके, अँड.घोडे एन.एन., अँड. तारे सी.एस., अँड .हिंगोले एस.के., अँड .एस.आर.अचमे, अँड . ए. व्ही., अँड. वाघचौरे एस.के., अँड . गंडले एस.आर. त्यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते
byमीडीया पोलीस टाईम
-
0