राष्ट्रिय महामार्ग प्रशासन *बे खबर* *सामान्य नागरिकांच्या संकेताकडे दूर्लक्ष* *. { मानवत / अनिल चव्हाण }* *( ९५२७३०३५५९/ ९३७०७७६१०४ )*—————————————मानवत शहर हे जूनी व्यापार पेठ असून हे शहर कापसावर प्रक्रिया करणारे शहर असल्यामुळे मानवत शहर व रूढी ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग धंदे निर्माण झाले असून शहराच्या आस पास आठ दहा जिनिंग प्रेसिंग असलेल्या जिनिंग निर्माण झाल्याने परप्रांतिय कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.त्याच बरोबर पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर परभणी जिल्हाला स्थान मिळाले आहे. मानवत हे शहर अतिशय जूनी व्यापार असल्याने शेतकर्यांच्या मालाला नगदी दाम या व्यापार पेठेत मिळत असल्याने कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली पण जिनिंग मालकांनी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे राष्ट्रिय महामार्गावर वाहनांचा मोठा ताफा दोन्ही बाजूने उभा रहात असल्यामुळे व काही व्यावसायीक खरेदीदारांची खरेदी हे राष्ट्रिय महामार्गावर निर्माण करण्यात आलेल्या जिनिंग प्रेसिंग मध्ये खरेदी करण्यात येत असल्यामुळे भविष्यात भरधाव धावणार्या वाहना मुळे अपघात होण्याचे संकेत जाणकार व्यक्त करीत असून मात्र या मार्गावर उभी राहत असलेल्या वाहनाची खबदारी घेण्यात येत नसल्यामुळे महामार्ग प्रशासन मात्र डोळे मिटून कूंभकर्णी झोपेत असल्याचे सोंग करीत असल्यामुळे प्रशासना विषयी संताप व्यक्त केल्या जात आहे. ***
byमीडीया पोलीस टाईम
-
0