लक्ष्मीचंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा४५ वर्षांनंतर भावस्पर्शी स्नेहसंमेलन सोहळा---------------------- शेलूबाजार: येथील लक्ष्मीचंद हायस्कूलच्या १९७९–८० या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा तब्बल ४५ वर्षांनंतर के . डी चांडे इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज शेलु बाजार येथे अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक व संस्मरणीय वातावरणात पार पडला. दीर्घ काळानंतर पुन्हा एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या भेटीने शालेय जीवनातील सुवर्णकाळ पुन्हा एकदा जिवंत झाला. या स्नेहसंमेलनाची सुरुवात महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून कुमकुम टिका लावून गेट-टुगेदर चा लोबो व तसेच गुलाबाचे फुल देऊन त्यांचे आगमन करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षक श्री पी एस राऊत सर, प्रमुख अतिथी श्री एन आर सुर्वे सर, श्री पी एल इंदोरे सर तसेच प्रमुख पाहुणे श्री रमेश पाटील शेगीकर व डॉक्टर तारकस साहेब जळगांव यांच्या हस्ते सरस्वति पूजन झाले . काही माजी विद्यार्थिनीं च्या हस्ते समई पूजन झाले. पूजनानंतरचा टप्पा स्वागत समारंभ माजी शिक्षकांचे व तसेच माजी विद्यार्थी सहपरिवार सोबत स्वागत घेण्यात आले. शाल व पुष्पगुच्छ देऊन व त्यांच्या परिवाराला साडी-चोळी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत समारोह नंतर सामूहिक श्रद्धांजली श्री लक्ष्मीचंद हायस्कूल शेलुबाजार 79-80 च्या बॅच चे दिवंगत माजी विद्यार्थी, शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, ट्रस्टी यांना अर्पण करण्यात आली. खरंच मित्रता ही कृष्णा आणि सुदामा सारखी असावी, याची सर्वांनी पावती दिली. जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी एक दिवसीय शाळा भरवण्यात आली. पूर्वीच्या काळी छडी लागे छम छम विद्या ये घमघम अशा शिक्षकांच्या हातून शाळा भरवण्यात आली. आदरणीय शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेचा टोल पडला म्हणजेच घंटा वाजली रांगा लावून प्रार्थनेसाठी तयार झालेत. सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. रांगेत वर्गखोलीत गेले . त्यानंतर शाळेतील जुन्या परंपरेनुसार शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली. ही हजेरी केवळ नावांची नव्हे, तर आठवणींची, ऋणानुबंधांची आणि जिव्हाळ्याची होती. तसेच कोणता विद्यार्थी किती दिवस गैरहजर होता त्याला शाळेत बोलवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत होत्या हे शिक्षकाने व्यक्त केले . प्रत्येक विषय शिक्षकांसोबत चर्चा झाली जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या कार्यक्रमात आपुलकी, कृतज्ञता आणि स्नेहाचे भाव अधिकच दृढ झाले. कार्यक्रमादरम्यान अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, शाळेने दिलेले संस्कार व जीवनघडणीतील योगदान याविषयी मनोगते व्यक्त केली. गुरु-शिष्य नात्याची घट्ट वीण आणि मैत्रीचा जिव्हाळा यांचा सुरेख संगम या स्नेहसंमेलनात अनुभवायला मिळाला. काही खेळ घेण्यात आले संगीत खुर्ची असे वेगवेगळे खेळ खेळण्यात आले. मधली सुट्टी झाली जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. टोल झाला व परत वर्ग भरला आणि प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. खरंच आज आपला जीवन प्रवास कसा झाला आणि एक स्वतःच्या पायावर अस्तित्व कसं उभं केलं गव्हर्मेंट नोकरी मिळवण्यासाठी किती जटावं लागलं हे सगळं त्याच्यात व्यक्त होत होतं आणि या सगळ्यांचा श्रेय म्हणजेच आमचे गुरु म्हणतात गुरु असेल तर नक्कीच आपण जीवनात सफल होतो. नंतरचा टप्पा म्हणजेच पावणेपाच वाजता पसायदान घेऊन नेहमीप्रमाणे शाळा सोडण्यात आली. अशी ही एक दिवसीय शाळा भरवण्यात आली होती. तसेच संपूर्ण स्नेहसंमेलन मेळावा अत्यंत शिस्तबद्ध, सौहार्दपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. जुन्या आठवणींचा ठेवा, नात्यांची ऊब आणि पुन्हा भेटीचा आनंद घेऊन हा मेळावा उपस्थित प्रत्येकाच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील, असा अविस्मरणीय ठरला. तसेच कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी अंतकला महादेव राऊत, शारदा जनार्दन येवले, मालती बाबनराव कावरे, रागिनी अनंतराव सपकाळ, शीला शंकरराव राऊत, देवीचंद लालचंद तोडरवाल, किसन नारायण अवगण, मधुकर सखाराम आगलावे, गणेश महादेवराव राऊत, मुस्तकीम अहेमद, प्रकाश नारायण पट्टेबहादूर, विठ्ठल रामचंद्र वानखडे, ज्ञानदेव वामन कोकरे, दामोदर महादेव राऊत, पांडुरंग अर्जुन खाडे, दयाराम परशराम खाडे रमेश मोतीराम पवार, मोतीराम पोमासिंग राठोड, भास्कर नामदेव सुर्वे, ज्ञानदेव पांडुरंग सुर्वे, ज्ञानेश्वर जनार्दन चौधरी, सुभाष भुजंगराव घुगे, अशोक श्रीराम बुरे, धोंडू विठोबा शिंदे, रमेश सिताराम ठाकरे प्रकाश केशवराव घुगे, सुभाष बबनराव घुगे प्रकाश यशवंत शिरसाट, साहेबराव सिताराम कोंगे यांची सहपरीवार उपस्थिती होती. के डी सी स्कूल च्या मुख्याध्यापिका व स्टाफ ने सहकार्य करून कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यास मदत केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0