रावेर आजंदे रस्त्याची दयनीय अवस्था.दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ, बांधकाम खात्याचे दुर्लक्ष? ( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे )रावेर अजंदा ऐनपुर रस्त्याची अनंदनीय अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून प्रवाशांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. रावेर पासून अवघ्या दोन तीन किलोमीटर अंतरानंतर अजंदे–रावेर दरम्यान रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडून खोल खड्डे निर्माण झाले असून वाहतूक अत्यंत धोकादायक झाली आहे.विशेषत: रावेर पासून सुमारे तीन किमी अंतरावरील पाईपलाईन साठी जेसीबीने खोदलेले खड्डे रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नसल्याने गंभीर अपघाताचा धोका आणखीनच वाढला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, रस्ता बांधकामाच्या वेळी रावेरसह अजंदे दरम्यानच्या काही भागासाठी आवश्यक परवानगी न मिळाल्याने काम अर्धवटच राहिले आहे . मात्र या अपूर्ण कामाकडे गेली अनेक दिवस सातत्याने दुर्लक्ष झाले, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.दररोज हजारो वाहने या मार्गावरून जातात खड्डेमय, उखडलेल्या आणि वळणदार रस्त्यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांना वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान, वेळेची नासधूस आणि प्रवासातील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मध्येच इंटरनॅशनल राका हायस्कूल . व पोदार हायस्कूल .रावेर कडे जाणारा व रावेर कडून ऐनपुर कडे जाणारा दैनंदिन सेवांना जोडणारा हा मुख्य मार्ग उद्ध्वस्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.... वाहतुकीवर परिणामया मार्गावरील अजंदे निंबोल ऐनपुर खिर्डी निंभोरा. वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. सततच्या जड वाहतुकीमुळे खड्डे अधिक मोठ्या प्रमाणावर वाढत असून फोर व्हीलर अनेक दुचाकीस्वार खोल खड्ड्यांमुळे घसरून पडल्याच्या घटना घडत आहेत. काही वाहनधारक जखमी झाल्याचे देखील समोर आले आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे नागरिक आणि वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यासह संपूर्ण रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे..
byमीडीया पोलीस टाईम
-
0