नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये आनंददायी *शनिवार* साजरा. (मानवत / प्रतिनिधी.)—————————येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात आज दिनांक 20 डिसेंबर आनंददायी शनिवार निमित्त विद्यालयात कवायती व गीत गायन बरोबर विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी विद्यालयातील बालाजी गोंन्टे, एकनाथ मुळे, सुरेखाताई चंदाले, मिनाक्षीताई कहात, संगीताताई थोरे, वैभव होगे, बाबासाहेब तेलभरे, कैलास अबूज , सुबान शहा, मा. मु. अनिल चव्हाण, साई मुनलोड यांच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला.यावेळी सर्वांच्या उपस्थिती मध्ये तक्रारपेटी उघडण्यात आली. यावेळी *तक्रार निरंक* निघाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. तर विविध कवायती व गीत गायनामध्ये शालेय मुलांनी सामूहिक गीत सादर केले...
byमीडीया पोलीस टाईम
-
0