हिंगणघाटचा साहसी बाईकवीर वैभव साटोणे निघाला नेपाळ दौऱ्यावर..* *आ. कुणावार यांनी दिल्या शुभेच्छा..* (हिंगणघाट वर्धा शहर प्रतिनिधी फैमोद्दीन शेख) हिंगणघाट,दि.२० डिसेंबर शहरातील माता मंदिर वॉर्ड येथील रहिवासी वैभव साटोणे हा साहसी युवक वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरापासून नेपाळ दौऱ्यावर निघाला आहे. आज विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचा आशीर्वाद प्राप्त करीत त्याने आपला प्रवास सुरू केला आहे.आ. कुणावार यांनीसुद्धा त्याला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत त्याचे साहसी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी जवळपास ५ हजार किलोमीटरचा प्रवास बाईकने करणार असल्याची माहिती वैभवने दिली आहे. वैभव साटोणे हा हिंगणघाट शहरातील भारताबाहेर इतर देशांचीसुद्धा माहिती घेणार असून वैभव साटोणे हिंगणघाट शहरातील अभ्यास दौरा करणारा पहिला व्यक्ती ठरणार आहे, त्याला पुढील उज्वल भविष्याकरिता व त्याचा प्रवास यशस्वीरित्या तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी न येता सुरळीतपणे पार पडावा या करिता आज विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी वैभवला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
byमीडीया पोलीस टाईम
-
0