नांदेड जिल्ह्यात वंचीत चा पहिला नगरसेवक.. ( मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड) नांदेड :नांदेड जिल्ह्यातील कंधार नगरपरिषदेत,वंचित चा पहिला नगरसेवक व वैदू समाजाचा सुद्धा पहिला नगरसेवक होण्याचा बहुमान दिलीप संतराम देशमुख यांना मिळाला आहे,नांदेड जिल्ह्यातील कंधार नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून,वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप संतराम देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला आहे,गेल्या पन्नास वर्षातील समाजाचे पहिले नगरसेवक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी भटक्या,समाजातील सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून तिकीट दिले त्यांनी खऱ्या अर्थाने उपेक्षित समाजाला, न्याय दिला असे नगरसेवक दिलीप संतराम देशमुख म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तळागाळातील,शोषित वंचित समाजाला सत्तेत भागीदारी देण्याच कार्य,आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक व शेवटच्या माणसाला राजकीय जमात,बनण्याचे आदेश व मार्ग दाखवले आहेत.पण इथल्या प्रस्थापित घराणे शाही नेत्यांनी, दलित वंचित घटकातील कोणत्याही कार्यकर्त्याला सत्तेत ,भागीदारी दिली नाही पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक समूहातील कार्यकर्त्याला,सत्तेत भागीदारी देण्यासाठी उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीशी खंबीर पणे वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण टीम व बाळासाहेबांनी उभा टाकले आहेत, नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे केले,आहेत प्रत्येक समाजाला उमेदवारी दिलेली आहे. त्या ठिकाणी,वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी चांगल्या प्रकारचे मते घेतले असून नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र वंचित ने खाते खोलून,प्रस्थापितांना धडाका भरला आहे या वैदु समाजाला पन्नास वर्षापासून कोणत्याच पक्षाने तिकीट दिले नाही, त्या समाजाला वैदू समाजाला कंधार नगरपरिषद मध्ये बाळासाहेबांनी तिकीट देऊन निवडून सुद्धा आणले आहे,यात वंचित बहुजन आघाडीचे शिवाभाऊ नरंगले व वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी, कंधार तालुका पदाअधिकारी, वैदू समाजाचे नगरसेवक दिलीप संतराम देशमुख यांच्या, साठी मेहनत घेतली आहे.

नांदेड जिल्ह्यात वंचीत चा पहिला नगरसेवक..                             
Previous Post Next Post