राशन दुकान रामभरोसे, दक्षता समिती वाऱ्यावर! (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.25:- माजरी परिसरात सद्यस्थितीत राशन दुकाने रामभरोसे असल्यामुळे परिसरातील येथील नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान कोणत्याही दुकानात वेळापत्रक लावलेले नाहीत, शासकीय नियमानुसार दुकान दररोज चार ते सहा तास उघडले जात नाही.ग्राहकांच्या सोयीसाठी वेळ ठरवलेली नसून त्यांचे वेळापत्रक लावले जात नाही.वितरण नियमानुसार दुकानात आलेल्या धान्याची तपासणी, तोल,आणि गुणवत्ता याबाबतची जबाबदारी दुकानदाराची असून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे.तुटवडा, स्टॉक संपला असे सांगून रेकॉर्ड वर स्टॉक दाखविला जातो आहे काही दुकानात कित्येक वर्षापासून असलेले जुने वजनकाटे वापरात आहेत.इलेक्ट्रॉनिक वजन काटे अजूनही वापरले जात नाहीत.परिणामी ग्राहकांना वजनापेक्षा कमी धान्य वितरित केले जात आहे.दुकानाबाहेर लावलेल्या माहिती फलकावर महिन्याचा स्टॉकचा तपशील लिहिल्या जात नसून दुकानाचे वेळापत्रक, तक्रार निवारण क्रमांक,दुकानाचा परवाना क्रमांक, ग्राहकांचे अधिकार याबाबत सविस्तर माहिती फलक एकही दुकानात आढळून येत नाही.तसेच दुकानदार दुकानात स्टॉक वही,वितरण नोंद वही FPS(fair price shop )परवाना ठेवत नसून पुरवठा खात्याची निरीक्षण नोंदवही सुद्धा उपलब्ध नसते.काही दुकानदार नागरिकांवर रोष काढून रेशन थांबविण्याचा प्रयत्न करत असून धान्याचा काळाबाजार करताहेत तसेच दुकानातील धान्य रात्री चोरून विक्रीसाठी वाचविल्या जात आहे.याबाबत तरुणभारत प्रतिनिधी यांनी विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहेत.दरम्यान या सर्व गोष्टीवर आळा बसावा यासाठी स्थानिक पातळीवर दक्षता समिती असते परंतु माजरी परिसरात अवलक्ष करणारी दक्षता समिती आहे. त्यांनी कधी ग्राहकांच्या समस्या ऐकून घेतल्याचा आढावा नाही पाच वर्षापासून दक्षता समितीची निवड प्रक्रिया स्थगित असल्याचे दिसून येत आहेव्हर्जन :- तहसीलदार काळे भद्रावती :- दक्षता समित्या ची नवीन अपडेट माझ्याकडे अजून नाही मी पुरवठा अधिकारी हर्षा दुधे यांना विचारपूस केल्यानंतर माहिती देऊ शकतो कारण या सर्व जबाबदाऱ्या त्याकडे आहेत.राशन दुकानदार :- माजरी ( विजय पोतदार) आमच्याकडे आलेले धान्य ज्या प्रतीचे असते आम्ही जसेच्या तसे वितरित करतो तो माल आमच्याकडे शासकीय गोदामतून येतो आमच्या घरून नाही तसेच काही लाभार्थी धान्य सोडवतात तर काही बाहेरगावी राहत असल्यामुळे सोडवत नाही त्यामुळे तो दोष आमचा नाही.

राशन दुकान रामभरोसे, दक्षता समिती वाऱ्यावर!             
Previous Post Next Post