अकोला : मनसे–शिवसेना (उद्धव) युतीचा एल्गार; सिव्हिल लाईनमध्ये जल्लोषाचा स्फोट ! * (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या युतीच्या घोषणेनिमित्त शिवसेना कार्यालयात फटाक्यांचा कडकडाट, घोषणांचा कडकडाटमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा जाहीर होताच अकोल्याच्या सिव्हिल लाईन परिसरात राजकीय तापमान चढलं. शिवसेना कार्यालयात आनंदोत्सवाचा भडका उडाला. घोषणा, फटाके, पेढे आणि जल्लोषात कार्यकर्त्यांनी युतीचे स्वागत करत विरोधकांना थेट संदेश दिला.मनसे व शिवसेना (उद्धव) या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “युती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक वळण” असा ठाम विश्वास व्यक्त करत उपस्थितांनी सकारात्मक बदलाचा निर्धार केला.या वेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष श्रीगोपाल दटकर, मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, मनसे शहराध्यक्ष सौरभ भगत, शिवसेनेचे सुरेंद्र विसपुते, महिला जिल्हाध्यक्ष प्रशांत आंबेरे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले, शहराध्यक्ष राकेश शर्मा यांच्यासह असंख्य शिवसैनिक व मनसैनिकांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले.अकोल्यात युतीचा हा जल्लोष केवळ उत्सव नव्हे, तर आगामी राजकीय रणसंग्रामाची ठोस नांदी ठरली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0