अवैध रेती वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर जप्त. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.29 चिमूर तालुक्यांमध्ये गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत नियमित तपासणी करुन कोणत्याही नदीपात्रातून किंवा नाल्यातुन रात्री रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुक रोखण्याकरीता फिरते पथक स्थापण करण्यात आले आहे.त्या अन्वये दिनांक २५/१२/२०२५ रोजी पहाटे ३.१५ वाजताचे सुमारास चिमूर नेरी रोडवर श्रीधर राजमाने तहसिलदार चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील उमरे,केतन घरकेले,शुभम बदकी निरज चिंतावार,ग्राम महसूल अधिकारी यांच्या पथकाने विना नंबर निळ्या कलर चे मुंडा व लाल कलरची ट्रॉली असलेले दोन ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करीत असल्यामुळे सदर ट्रॅक्टर वर जप्तीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.जप्त केलेले ट्रॅक्टर हे गौतम पाटील रा.चिमूर व मनोज नागापूरे रा.चिमूर यांचे असून सदर जप्त केलेले दोन्ही ट्रॅक्टरवर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्यात येत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0