रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी त्यांची नावे अतिक्रमणातून वगळले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायतीची टाळाटाळ .. नांदगाव ! तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केलेले असून देखील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांनी अतिक्रमण रजिस्टर मध्ये नोंदी करण्यास हेतू पुरस्कार टाळाटाळ केली असून त्यांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल होऊन देखील अद्याप पर्यंत ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही. उलट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रकार रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर्मचारी यांना संपूर्ण गावातील अतिक्रमणधारकांचा सर्वे करण्यास सांगितला होता. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडे ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार व ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर यांनी हे काम दिल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केलेली असताना व त्यांचा चुलत भाऊ ग्रामरोजगार सेवक यांनी देखील अतिक्रमण केलेली असून त्यांची दोघांची नावे अतिक्रमण सर्वे मधील यादीत न दिल्याने ग्रामपंचायत ने त्यांच्या नोंदी अतिक्रमराष्ट्रमध्ये केल्या नाहीत. हेच काम ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतः केली असती किंवा बाहेरील शासकीय व्यक्तीला काम दिले असते तर हुकूमशाहीने काम न होता ही पक्षपाती अतिक्रमण यादी चा सर्वे झाला असता. सदरचे अतिक्रमण सर्वे करण्याची काम ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला दिल्यामुळे त्यांनी गावात राजकारण करून हुकूमशाही पद्धतीने सर्व लोकांची नावे अतिक्रमण सर्व मधी घेतले आणि स्वतःचे नाव घेतली नाही.त्यामुळे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये रोहिले बुद्रुक गावठाणात असलेल्या मारुती मंदिराजवळ ग्रामपंचायतींच्या जागेवर वाहने व कृषी अवजारे ग्रामपंचायत कर्मचारी अनिल संताराम अरबुज व ग्रामरोजगार सेवक बाबासाहेब तुकाराम अरबूज यांनी अतिक्रमण करून वाहने उभे करत असल्याने तेथील अतिक्रमण काढण्यात यावे याबाबत रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला दिला होता परंतु सदर ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार व ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर व ग्रामपंचायत सदस्य यांनी कोणत्याही प्रकारची पाहणी न करता अद्याप पर्यंत तेथील अतिक्रमण काढलेले नाही. आणि अतिक्रमण रजिस्टर मध्ये देखील त्यांच्या नोंदी ग्रामपंचायत घेण्यास तयार नाही. तर ही ग्रामपंचायतची हुकूमशाही आहे की काय? लोकशाही प्रमाणे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, व अधिकारी कामकाज का करत नाही असा सवाल मुक्ताराम बागुल यांनी उपस्थित केला आहे. जर ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अतिक्रमणे काढायची नसतील आणि ग्रामपंचायतीची हद्दीतील जागा कर्मचाऱ्यांना वापरण्यासाठी द्यावयाची असेल तर त्यांची नावे ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण रजिस्टर मध्ये नोंदी करण्यात यावी व त्याची नक्कल मला मिळावी. अन्यथा हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विरोधात आठ दिवसात ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे कामकाज चालते त्या कार्यालयासमोर अर्ध नग्न आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, व ग्रामपंचायत सदस्य राहतील. असा इशारा रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य मुक्ताराम बागुल यांनी दिला आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0