*"मूल्यवर्धन शिक्षण हाच सामाजिक ग्रंथ होय"**@)>सुदर्शन चिटकुलवार,* {प्राचार्य, डायट. (परभणी.}प्रतिनिधी / अनिल चव्हाण.——————————आजच्या विज्ञान युगात हरवत जात असलेली नैतिक मूल्य, सामाजिक मूल्य, कौटुंबिक मूल्य व संविधानिक मूल्य हरवत असल्याची जाणीव शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य सोबत सामंजस्य करार करून एक अभिनव शैक्षणिक उपक्रम हा पूर्ण महाराष्ट्रातील शाळेत *"मूल्यवर्धन 3.0"* राबविण्याचे निर्धारित केले आहे.याच अनुषंगाने पाथरी तालुक्या मध्ये "मूल्यवर्धन 3.0 " च्या अंतिम टप्प्याचे प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणास जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली (१ ) ते आठवी ( ८ ) च्या १२० शिक्षकांचा समावेश गट शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, पाथरी यांनी केले. सदरील प्रशिक्षण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पाथरी येथे आयोजित केले होते.या प्रशिक्षणास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, डायट, परभणीचे प्राचार्य श्री. सुदर्शन चिटकुलवार व अधिव्याख्याता परिहार यांनी भेट दिली. भेटी दरम्यान चिटकुलवार यांनी मूल्ये ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून या मूल्यवर्धन शिक्षण या सामाजिक ग्रंथाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना मूल्य संवर्धन करायचे मौल्यवान कार्य शिक्षकांना दिल्याचे सांगितले. मूल्यवर्धनच्या माध्यमातून भविष्यातील पिढी ही कल्पक, चिकित्सक विचार, सर्जन शीलता, जबाबदार, संवेदनशील व समस्या सोडवण्याची क्षमता बालकांमध्ये वाढवता येते.या प्रशिक्षणात विविध जीवन मूल्यवर आधारित चर्चा, कृती व उपक्रमाचे सादरीकरण गटशिक्षण अधिकारी श्री मुकेशजी राठोड यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आले. यावेळी सुलभक म्हणून कुसुम कच्छवे, सुधीर पाटील, दीपक रणदिवे, राजू उबाळे, अमोल जगताप व संपत राऊत यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडली. तर गटसांधन केंद्र पंचायत समिती पाथरीचे हनुमंत माने, रखमाजी कावळे व शांतीलाल मुथा फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रवीणजी नरवाडे यांनी विशेष परिश्रम घेऊन सहकार्य केले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0